Virat Kohli ODI Century Record : भारताची रनमशीन विराट कोहलीने श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात विक्रामांचा रतीबच लावला. रोहित आणि शुभमन गिलने 95 धावांची सलामी दिली. त्यानंतर गिलने शतकी खेळी करत विराटसोबत दुसऱ्या विकेटसाठी 131 धावांची भागीदारी रचली. गिल 117 धावांवर बाद झाल्यानंतर विराट कोहलीने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत वनडेमधील 46 वेश शतक ठोकले. विशेष म्हणजे विराट कोहलीच्या या शतकी खेळीमुळे अनेक विक्रम झाले.
विराट कोहलीला 72 व्या शतकासाठी जवळपास 2 अडीच वर्षे वाट पहावी लागली. मात्र विराटने हा शतकांचा दुष्काळ संपवला अन् शतकींची बरसातच होऊ लागली आहे. विराट कोहलीने गेल्या चा डावात तब्बल 3 शतकी खेळी करत शतकांची पंचाहत्तरी पार करण्याचा जवळ पोहचला आहे.
विराटने आपले 72, 73 आणि 74 वे आंतरराष्ट्रीय शतक हे अवघ्या 4 डावात ठोकले. याचबरोबर विराट कोहलीने मायदेशात सर्वाधिक वनडे शतके ठोकण्यातही सचिन तेंडुलकरला मागे टाकले. विराट कोहलीची आता भारतात 21 वनडे शतके झाली आहेत.
विराटच्या शेवटच्या चार वनडे इनिंग
91 चेंडूत 113 धावा
87 चेंडूत 113 धावा
9 चेंडूत 4 धावा
110 चेंडूत नाबाद 166 धावा
विराट कोहलीने 74 व्या शतकी खेळी नंतर अनेक विक्रमांना आणि माईल स्टोनला गवसणी घातली आहे.
सर्वाधिक वनडे धावा (विराटने जयवर्धनेला टाकले मागे, पोहचला पहिल्या पाचात)
सचिन तेंडुलकर 452 डावात 18426 धावा
कुमार संगकारा 380 डावात 14234 धावा
रिकी पाँटिंग 365 डावात 13704 धावा
सनथ जयसूर्या 433 डावात 13430 धावा
विराट कोहली 259 डावात 12651 धावा
सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतके
विराट कोहली 74
डेव्हिड वॉर्नर 45
जो रूट 44
स्टीव्ह स्मिथ 42
रोहित शर्मा 41
सर्वाधिक विजय मिळवून देणारी शतके
विराट कोहली 37
सचिन तेंडुलकर 33
रिकी पॉटिंग 25
भारताने श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात 391 धावांचे आव्हान ठेवले. विराट कोहलीच्या दमदार दीडशतकी (110 चेंडूत 166 धावा खेळीच्या जोरावर भारताने 50 षटकात 5 बाद 390 धावांपर्यंत मजल मारली. विराटला शुभमन गिलने 116 धावांची शतकी खेळी करत चांगली साथ दिली. रोहित शर्माने 42 तर श्रेयस अय्यरने 38 धावांचे योगदान दिले.
हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.