Virat Kohli King brand value most expensive celebrity in India sakal
क्रीडा

कोहलीच ब्रँड व्हॅल्यूचा‘किंग’; किंमत कमी होऊनही मारला 'पंच'

कर्णधारपदावरून पायउतार होऊनही विराट कोहलीने २०२१ च्या ‘डफ अँड फेल्‍प्स सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन’ अहवालामध्ये पाचव्यांदा सर्वांत मौल्यवान सेलिब्रिटी म्हणून बाजी मारली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : कर्णधारपदावरून पायउतार होऊनही विराट कोहलीने २०२१ च्या ‘डफ अँड फेल्‍प्स सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन’ अहवालामध्ये पाचव्यांदा सर्वांत मौल्यवान सेलिब्रिटी म्हणून बाजी मारली आहे. कोहलीचे ब्रँड मूल्य २०२० मध्ये २३७.७ दशलक्ष डॉलर्स इतके होते. त्यानंतर ते २०२१ मध्ये १८५.७ दशलक्ष डॉलर्सपर्यंत घसरले.

त्याच्यापाठोपाठ अभिनेता रणवीर सिंगचे ब्रँड मूल्य वाढले असून तो आता १५८.३ दशलक्ष डॉलर्स ब्रँड मूल्यासह तिसऱ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर आला आहे; तर बॉलीवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार १३९.६ दशलक्ष डॉलर्सच्या ब्रँड मूल्यासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रीपल आर चित्रपटातील अभिनेत्री आलिया भट्ट ६८.१ दशलक्ष डॉलर्स ब्रँड मूल्यासह चौथ्या क्रमांकावर आली आहे. त्यामुळे ती अव्वल १० मधील सर्वांत तरुण सेलिब्रिटी ठरली असून ती महिला बॉलीवूड कलाकारांमध्ये सर्वांत मौल्यवान ब्रँडदेखील आहे.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी २०२१ मध्ये ६१.२ दशलक्ष डॉलर्स ब्रँड मूल्यासह पाचव्या क्रमांकावर आला आहे, परंतु २०२० मध्ये धोनीची ३६.३ दशलक्ष डॉलर्स इतकी असणाऱ्या ब्रँड मूल्यात गेल्या वर्षी मोठी वाढ झाली आहे. ‘‘धोनीच्या मागे अजूनही मोठ्या प्रमाणात फॉलोअर्सचा गराडा आहे. तसेच त्याने त्याची शुद्ध क्रिकेटपटूची प्रतिमा निवृत्तीनंतरही हुशारीने जपली आहे.’’ असे डफ अँड फेल्प्सने आपल्या अहवालात म्हटले आहे.

२०२१ मध्ये भारतातील अव्वल २० सेलिब्रिटींची एकूण ब्रँड व्हॅल्यू १.२ अब्ज डॉलर्स इतकी होती, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १२.९ टक्क्यांनी वाढली आहे. बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू २०२१ मध्ये २२ दशलक्ष डॉलर्स ब्रँड मूल्यासह अव्वल २० गटामध्ये नव्याने सामील झाली आहे.

‘‘आम्ही व्यवसाय आणि ब्रँड्समध्ये डिजिटल एक्सीलरेशनच्या दुसऱ्या टप्प्यात आहोत. २०२१ च्या सेलिब्रिटींमध्ये, विराट ब्रँड व्हॅल्यू तक्त्यावर राज्य करत असताना रणवीर, आलिया आणि धोनी यांनीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत ब्रँड व्हॅल्यूमध्ये चांगली उडी घेतली आहे,’’ असे डफ आणि फेल्प्सचे व्यवस्थापकीय संचालक अविरल जैन यांनी म्हटले आहे.

सर्वाधिक ब्रँड मूल्य असणारे सेलिब्रिटी

  • विराट कोहली : १८५.५ दशलक्ष डॉलर्स

  • रणवीर सिंग : १५८.३ दशलक्ष डॉलर्स

  • अक्षय कुमार : १३९.६ दशलक्ष डॉलर्स

  • आलिया भट्ट : ६८.१ दशलक्ष डॉलर्स

  • महेंद्रसिंग धोनी : ६१.१ दशलक्ष डॉलर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT