लंडन : इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने 10 विकेट्स राखून विजय मिळवत मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना (England vs India 2nd ODI) 14 जुलैला मँचेस्टरमध्ये होत आहे. मात्र याही वनडे सामन्याला भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मुकण्याची शक्यता आहे. त्याचा मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे विराट कोहली इंग्लंड विरूद्धची पहली वनडे खेळला नव्हता.
एएनआय वृत्तसंस्थेच्या बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विराट कोहलीचा दुखावलेला मांडी स्नायू अजून बरा झालेला नाही. त्यामुळे तो दुसऱ्या वनडे सामन्याला देखील मुकण्याची शक्यता आहे. केनिंग्टन ओव्हलवर मंगळवारी झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीच्या जागी श्रेयस अय्यरला संघात स्थान देण्यात आले होते.
पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने भेदक मारा करत इंग्लंडचा संपूर्ण डाव 110 धावात गुंडाळला. बुमराहने 19 धावात 6 तर मोहम्मद शमीने 31 धावात 3 बळी टिपले. तर प्रसिद्ध कृष्णाने 1 विकेट घेतली. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटरलने सर्वाधिक 30 धावा केल्या.
भारताने इंग्लंडचे 111 धावांचे आव्हान 20 षटकाच्या आतच पार केले. सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी सावध सुरूवातीनंतर आक्रमक फलंदाजी केली. या दोघांनी नाबाद 111 धावांची भागीदारी रचत इंग्लंडचे आव्हान बिनबाद पार केले. रोहित शर्माने 58 चेंडूत नाबाज 76 धावांची तर शिखर धवनने 54 चेंडूत 31 धावांची नाबाद खेळी केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.