Virat Kohli Twitter
क्रीडा

"आक्रमकपणा विराटला भोवतोय, त्याची सत्ता गाजवण्याची सवय..."

विराज भागवत

भारताच्या माजी क्रिकेटपटूने केली कोहलीची कानउघाडणी

Ind vs Eng 4th Test: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या चांगल्या लयीत (Out of Form) नाहीये. पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीत विराटची बॅट फारशी तळपली नाही. पण भारताने (Team India) चांगली कामगिरी केल्याने त्याच्या फलंदाजीवर टीका झाली. तिसऱ्या सामन्यात (3rd Test) मात्र विराटसेना अपयशी ठरली. भारताला १ डाव आणि ७६ धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर विराटच्या फलंदाजीवर अनेक प्रश्न उपस्थित राहिले असून माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याने विराटच्या फलंदाजीतील मूळ समस्या काय त्याचे कारण सांगितले.

"विराट उत्तम फलंदाज आहे. त्याच्या तयारीत काहीच उणीव राहत नसणार याची मला खात्री आहे. पण मला वाटतंय की विराट प्रत्येक गोलंदाजावर सत्ता गाजवायला जातो. त्यामुळे तो ऑफ स्टंपच्या बाहेरचे चेंडूदेखील खेळतो. ही एक छोटी गोष्ट आहे. पण अतिआक्रमकपणा विराटला सध्या भोवतोय. विराटच्या फलंदाजीच्या तंत्रात काहीच अडचण नाहीये. खरी समस्या त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीत आहे. विराट कोहलीचा अतिआक्रमकपणा त्याला धावा करण्यापासून नकळतपणे रोखतोय", अशा शब्दात पठाणने विराटची कानउघाडणी केली.

विराटच्या फलंदाजीवर अँडरसन काय म्हणाला...

"विराट कोहली बदललाय की नाही मला माहिती नाही. पण त्याच्या फलंदाजीबद्दल बोलायचं तर त्याच्या फलंदाजीच्या तंत्रात थोडीशी समस्या असल्याचं दिसतंय. त्यामुळेच त्याच्या धावा होत नाहीत. इंग्लंडच्या पीचवर ज्याप्रकारे चेंडू वेगाने जातो, त्याचा फटका विराटच्या तंत्राला बसलाय. विराटने आमच्याविरूद्ध मुंबईत द्विशतक ठोकलं तिथे चेंडू त्या वेगाने येत नव्हते. इथे इंग्लंडमध्ये मात्र चेंडू स्विंग होतोय आणि त्यामुळेच विराट लगेच बाद होतोय. वेगवान नसलेल्या खेळपट्ट्यांवर विराट चांगली फलंदाजी करतो. सध्या विराटची फलंदाजी फारशी चांगली होत नाही हेच खरं आहे. पण त्याला कमी लेखून चालणार नाही. कारण जर तुम्ही त्याला मारण्यासाठी चेंडू दिलात, तर मात्र तो तुम्हाला सीमारेषेपार पोहोचवेल", असं अँडरसन म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT