virat kohli  
क्रीडा

Virat Kohli : विराटचा ‘पॉवर गेम’ परतला; सीमा रेषेपर्यंत पोहचणारे फटके आता...

जवळपास गेली तीन वर्षे फॉर्मशी झगडत असलेल्या विराट कोहलीने...

Kiran Mahanavar

Virat Kohli : विराट कोहली आपल्या ताकदीच्या खेळासह परतला आहे. विश्वकरंडक स्पर्धेच्या उंबरठ्यावर त्याच्यासाठी सर्व गोष्टी योग्य वेळी घडू लागल्या आहेत. हे भारतीय संघासाठीही सुचिन्ह आहे, असे मत माजी फलंदाज आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे.

जवळपास गेली तीन वर्षे फॉर्मशी झगडत असलेल्या विराट कोहलीने कमजोर झालेल्या मानसिकतेवरही मात केली आणि आशिया करंडक स्पर्धेपासून पुन्हा आपल्या बॅटमधून धावांचा ओघ सुरू केला. आशिया करंडक स्पर्धेत भारताकडून तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. लगेचच मायदेशात नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत निर्णायक सामन्यात अर्धशतक करून जुन्या विराट कोहलीची आठवण करून दिली.

आशिया करंडक स्पर्धेपासूनच्या प्रत्येक सामन्यात विराटने धावा केल्या आहेत. केवळ धावाच नाहीत, तर सामन्यागणिक त्याची प्रगती होत आहे. माझ्या मते त्याच्या ‘पॉवर गेम’चे पुनरागमन झाले आहे. विशेष म्हणजे या खेळावर त्याचा विश्वास आहे, असे विश्लेषण मांजरेकर यांनी केले आहे.

आत्मविश्वास परतल्यामुळे कोहली आता चांगला चेंडूही सीमापार धाडत आहे. अशा फलंदाजांना केवळ आत्मविश्वासाची गरज असते, पण ते पुन्हा क्रिकेटविश्व गाजवू लागतात असे मांजरेकर म्हणाले. आशिया करंडक स्पर्धेत विराटने ९२ च्या सरासरीने पाच सामन्यांतून २७६ धावा फटकावल्या होत्या. एक शतक आणि दोन अर्धशतकांसह त्याचा स्ट्राईक रेट १४७.५९ असा होता.

याच आशिया करंडक स्पर्धेतून विराटसाठी एकेक गोष्ट त्याच्या पथ्यावर पडू लागली होती. पूलच्या फटक्यावरचे नियंत्रण मिळाले होते. याच फटक्यातून षटकारांची बरसात होऊ लागली होती. आयपीएलमध्येही त्याचे असे फटके सीमा रेषेजवळ पडायचे, पण आता हेच फटके स्टेडियममध्ये पडत आहेत. विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी असा आत्मविश्वास संघासाठीही मौल्यवान असल्याचे मांजरेकर यांनी सांगितले.

भुवनेश्वर अतिक्रिकेटचा परिणाम

डेथ ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा देत असल्यामुळे सध्या टीका होत असलेल्या भुवनेश्वर कुमारवरही मांजरेकर यांनी भाष्य केले आहे. ते म्हणतात, भुवीवर सातत्याने खेळण्याचा परिणाम झाला आहे.भारतीय संघाच्या गेल्या सर्वच सामन्यांतून तो खेळलेला आहे. दुखापतीनंतर तो संघात आला तेव्हा सुरुवातीच्या काही सामन्यांत त्याने चांगली प्रभावी गोलंदाजी केली होती, परंतु सातत्याने खेळत राहिल्याचा परिणाम होत गेला. केवळ अतिक्रिकेटमुळेच भुवीचा फॉर्म हरपला आहे असे मी म्हणेन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Ram Naik : अलीकडच्या राजकारणात एकमेकांना नाव ठेवण्याची स्पर्धा : राम नाईक यांनी व्यक्त केली खंत

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

SCROLL FOR NEXT