मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी ( IND vs NZ 2nd test ) वादग्रस्त निर्णयाने चांगलीच चर्चेत आली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli ) विश्रांतीनंतर संघात परतला होता. त्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र तो स्वतः शुन्यावर बाद झाल्याने त्याच्या चाहत्यांची निराशा झाली. परंतु विराट बाद होता की नाही याबाबत आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने दमदार ८० धावांची सलामी दिली. मात्र एजाज पटेलने ( Ajaz Patel ) भारताला पाठोपाठ धक्के देत संघाची अवस्था ३ बाद ८० अशी केली. त्याने चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली या भारताच्या दोन अनुभवी फलंदाजांना शुन्यावर बाद करत भारताला मोठा धक्का दिला.
मात्र विराट कोहलीला पायचीत बाद देण्याबाबत सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. विराट कोलहीनेही बाद दिल्यानंतर लगेचच रिव्हि्यू घेतला. तिसऱ्या पंचांनीही बराच वेळी रिप्ले पाहिला कारण चेंडू पहिल्यांदा बॅटला लागला आहे का पॅडला लागला हे स्पष्ट होत नव्हते. अखेर अनेकवेळा रिप्ले पाहिल्यानंतर तिसऱ्या पंचांनी विराट कोहलीला बाद दिले.
विराट कोहलीही बाद दिल्यानंतर निराश झाला होता त्याने आपली निराशा बाऊंडरी लाईन वर आपली बॅट आपटली. दरम्यान, विराटला बाद देण्यावर वासिम जाफरने ( Wasim Jaffer ) देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्याने 'माझ्या मते चेंडू पहिल्यांदा बॅटला लागला. पण मला निर्णयावेळी सबळ पुरावा लागतो याची जाणीव आहे. मात्र मला असे वाटते की या प्रकरणात सारासार विचार करायला हवा होता. पण, सारासार विचार ही सामन्य गोष्ट नाही. मला विराट कोहलीबद्दल वाईट वाटते.' अशी प्रितिक्रिया कू या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिली.
दरम्यान, विराट कोहली बाद झाल्यानंतर ज्यावेळी पॅव्हेलियनमध्ये पोहचला त्यावेळी त्याने तिसऱ्या पंचाच्या निर्णयाचा रिप्ले पाहिला. यावेळी तेथे प्रशिक्षक राहुल द्रविडही ( Rahul Dravid ) उपस्थित होते. विराटने रिप्ले पाहून आपल्या डोक्यालाच हात लावला. तर राहुल द्रविड पंचांच्या निर्णयावर हसताना दिसले.
विराटच्या निर्णयावर सोशल मीडियावर माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांच्या प्रतिक्रिया देखील आल्या. व्ही व्ही एस लक्ष्मणने (VVS LAxman) समालोचन करताना सांगितले की ज्यावेळी बॅट आणि पॅड हे एकत्र नव्हते तर निर्णय हा फलंदाजाच्या बाजूने द्यायला हवा होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.