Virat Kohli On His Social Media Earning Sakal
क्रीडा

Virat Kohli Insta Post Value: 'मी एवढे पैसे घेत नाही, माझ्याविषयी खोट्या...' इंस्टाग्रामच्या कमाईवर विराट कोहलीने सोडले मौन

Kiran Mahanavar

Virat Kohli On His Social Media Earning : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील कमाईच्या बातम्या वेगाने पसरत होत्या. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात होता की, कोहली एका इंस्टाग्राम पोस्टसाठी सुमारे 14 कोटी भारतीय रुपये घेतो. मात्र आता खुद्द विराट कोहलीने याचा खुलासा करताना हे खोटे असल्याचे सांगितले.

विराट कोहलीने एका ट्विटमध्ये आपल्या सोशल मीडिया कमाईच्या बातम्यांबद्दल सांगितले आहे. कोहलीने सांगितले की, त्याच्याबद्दल ज्या काही बातम्या इकडे-तिकडे पसरवल्या जात आहेत, त्या सर्व खोट्या आहेत. कोहलीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "आयुष्यात मला मिळालेल्या सर्व गोष्टींसाठी मी कृतज्ञ आणि ऋणी आहे, परंतु माझ्या सोशल मीडियावरील कमाईबद्दलच्या बातम्या खरे नाहीत."

म्हणजेच, आता हे पूर्णपणे स्पष्ट झाले आहे की कोहली एका इंस्टाग्राम पोस्टसाठी 14 कोटी भारतीय रुपये घेत नाही. याचा खुलासा खुद्द कोहलीने केला आहे. विराट कोहली हा भारतातील इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केलेला सेलिब्रिटी आहे. इन्स्टावर 256 दशलक्ष लोक त्याला फॉलो करतात. कोहली जगातील सर्वात प्रसिद्ध खेळाडूंपैकी एक आहे.

कोहली अनेकदा इन्स्टाग्रामवर कोणत्या ना कोणत्या जाहिराती करताना दिसतो. अॅडच्या माध्यमातून विराट कोहली चांगली कमाई करतो. पण ते एका पोस्टसाठी किती शुल्क घेतात हे स्पष्ट झालेले नाही. खुद्द कोहलीने मीडिया रिपोर्ट्सचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

विराट कोहली सध्या कोणत्याही मालिकेचा भाग नाही. अलीकडेच तो वेस्ट इंडिज दौऱ्यावर कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळताना दिसला होता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत कोहलीसह अनेक स्टार खेळाडू टीम इंडियाचा भाग नव्हते.

अशा परिस्थितीत कोहली 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कपमधून पुनरागमन करेल. आशिया कप स्पर्धेत भारतीय संघ 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT