Asia Cup 2022 : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंजत आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये त्याने शेवटचे शतक झळकावले. तेव्हापासून त्याच्या फॉर्ममध्ये सातत्याने घसरण होत आहे. गेल्या महिन्यात इंग्लंड दौऱ्यात कोहलीला तिन्ही फॉरमॅटमध्ये अर्धशतकही झळकावता आले नाही. यानंतर त्याला वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर विश्रांती देण्यात आली होती.
आशिया कपमध्ये 28 ऑगस्टला टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी विराट कोहलीचा फॉर्म चर्चेचा विषय राहिला आहे. मात्र विराट कोहली या सामन्यात मैदानात उतरताच एक विशेष स्थान मिळवणार आहे. विराट कोहलीचा हा T20 क्रिकेटमधला 100 वा सामना खेळणार आहे.
विराट कोहली यासोबतच असा पराक्रम करणार आहे जो आतापर्यंत कोणताही भारतीय क्रिकेटपटूने केला नाही. विराट कोहली या सामन्यासह प्रत्येक फॉरमॅटमध्ये 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा पहिला भारतीय खेळाडू असेल. विराट कोहलीने आतापर्यंत 99 टी-20 सामन्यांव्यतिरिक्त 102 कसोटी आणि 262 एकदिवसीय सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 23 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. एवढेच नाही तर विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 70 शतके ठोकली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत विराट कोहली फक्त सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटिंगच्या मागे आहे.
इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेतही विराट कोहलीची बॅट पूर्णपणे शांत होती. इंग्लंड दौऱ्यावर अपयशी ठरल्यानंतर फलंदाजीत बदल केल्याचे विराट कोहलीने म्हटले आहे. आशिया कपमध्ये विराट कोहली कशी कामगिरी करतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आशिया चषकातील कामगिरीच्या जोरावरच विराट कोहलीला टी-20 विश्वचषकासाठी संघात स्थान मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.