Sunil-Gavaskar-Virat-Kohli 
क्रीडा

"बास झालं!! आता मात्र विराटने सरळ..."; गावसकरांचे रोखठोक मत

विराज भागवत

गेल्या पाच पैकी चार इनिंग्समध्ये विराट ठरला अपयशी

Ind vs Eng 3rd Test: भारतीय संघावर (Team India) तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी (Day 1) ७८ धावांत बाद होण्याची नामुष्की ओढवली. जेम्स अँडरसन (James Anderson), ओली रॉबिन्सन, सॅम करन आणि ओव्हरटन या चौघांनी टीम इंडियाचं कंबरडं मोडलं. मुंबईकर (Mumbai) रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) वगळता इतर कोणालाही दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. महान फलंदाजांच्या यादीत गणना होणाऱ्या विराट कोहलीलाही (Virat Kohli) स्वस्तात तंबूत परतावं लागलं. विराटने ७ धावा केल्या. अँडरससने त्याला आपल्या जाळ्यात बरोबर अडकवले. कसोटी मालिका सुरू झाल्यापासून गेल्या पाच पैकी चार डावांमध्ये विराट अपयशी ठरला. त्याच्या या सततच्या खराब कामगिरीवर लिटल मास्टर सुनील गावसकर (Sunil Gavaskar Angry and Unhappy) प्रचंड नाराज झाले. त्यांनी विराटला थेट एक सल्ला (Advice) दिला.

भारताच्या पहिल्या डावात ११व्या षटकात अँडरसन गोलंदाजी करत होता. भारताने झटपट दोन गडी गमावले होते. त्यामुळे विराट आणि रोहित यांच्या भागीदारी होणं महत्त्वाचं होतं, पण अँडरसनने स्टंपच्या अतिशय जवळून चेंडू आऊटस्विंग केला. विराटला तो चेंडू खेळणं भागच होतं पण स्विंगचा अंदाज न आल्याने विराट झेलबाद झाला. त्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेले सुनील गावसकर विराटवर भलतेच नाराज झाले. ते म्हणाले, "आता बास झाला. मला वाटत आता मात्र विराटने थेट सचिन तेंडुलकरला फोन करून त्याची मदत घेण्याची वेळ आहे. विराटने थेट त्याला फोन करावा आणि त्याला विचारावं की सुधारणा करण्यासाठी मी नक्की काय करू?"

Virat-Kohli-With-Phone

विराट बाद झाल्यानंतर काही वेळातच संपूर्ण संघ बाद झाला आणि इंग्लंडच्या संघाने त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद १२० धावा ठोकल्या.

त्याआधी भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला आणि तो पूर्णपणे चुकला. भारताचा डाव अवघ्या ७८ धावांत कोलमडला. इंग्लंडच्या वेगवान चौकडीने भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले. अँडरसन आणि ओव्हरटनने प्रत्येकी ३ तर रॉबिन्सन आणि करनने २-२ गडी बाद केले. त्यामुळे आता विराटसेना दुसऱ्या दिवसापासून कसा खेळ करते याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT