Dean Elgar on Virat Kohli Video:  
क्रीडा

Dean Elgar on Virat Kohli Video: कोहली माझ्यावर थुंकला, दोघात शिवीगाळही झाली; दिग्गज क्रिकेटरचा धक्कादायक खुलासा

Dean Elgar on Virat Kohli Video: दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेटपटू डीन एल्गरने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याच्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.

रोहित कणसे

Dean Elgar on Virat Kohli Video : दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेटपटू डीन एल्गरने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याच्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. एल्गरने कोहलीसोबत झालेल्या वादाबद्दल भाष्य केलं आहे. या भांडणात दोघांमध्ये शिवीगाळ झाल्याचा खुलासा देखील एल्गरने केला आहे. एल्गरने एका मुलाखतीत याबद्दल माहिती दिली असून या मुलाखतीची व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

२०१५ मध्ये एल्गर पहिल्यांदाच भारतात आला होता. त्यावेळी विराट कोहलीसोबत त्याचा वाद झाला होता. त्यावेळी विराट कोहली माझ्याकडे पाहूण थुंकला होता, इतकेच नाही तर एल्गर याने देखील कोहलीला असं काही केलंस तर बॅटने मारेल असं ऐकवलं होतं.

या व्हिडीओमध्ये एल्गर म्हणतो की, त्या दौऱ्यावेळी पिचवरून खिल्ली उडवली जात होती. तेव्हा मी फलंदाजीसाठी मैदानावर आलो. मी अश्विनविरोधात लय पकडण्याच्या प्रयत्नात होतो आणि त्याचं काय नाव जेजा (रविंद्र जडेजा) आणि कोहली माझ्याकडे पाहूण थुंकला. तेव्हा मी त्याला असं काही केलं तर तुला बॅटने मारेल असं ऐकवलं होतं. एल्गर याने यूट्यूब चॅनल Betway South Africa चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

जेव्हा एल्गरला तुझी स्थानिक भाषा कोहलीला समजली का असं विचारण्यात आलं तेव्हा एल्गर म्हणाला की कोहलीला लक्षात आलं होतं कारण आयपीएल मध्ये एबी डिव्हिलियर्स त्याच्यासोबत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु टीममध्ये खेळतो.

मात्र एल्गरने हेही स्पष्ट केलं की जेव्हा भारतीय संघ 2017-18 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता तेव्हा ड्रिंक्स दरम्यान कोहलीने त्याच्या वर्तनाबद्दल माफी मागीतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandra Kurla Complex Metro Station वर आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

SCROLL FOR NEXT