Virat Kohli T20 Career and T20I World Cup Team Selection Depends On England Limited Over Series ESAKAL
क्रीडा

Virat Kohli : टी 20 वर्ल्डकप संघातील स्थानासाठी विराट 'संघर्ष' अटळ?

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : विराट कोहलीने (Virat Kohli) गतवर्षी झालेल्या टी 20 वर्ल्डकपनंतर भारतीय टी 20 संघाचे कर्णधारपद सोडले होते. मात्र या घटनेला 9 महिने होत नाहीत तोच विराट कोहलीची टी 20 वर्ल्डकप संघातील (T20I World Cup Team) जागा देखील धोक्यात आली आहे. यंदाचा टी 20 वर्ल्डकप ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणार आहे. दरम्यान बुधवारी भारतीय निवडसमितीने वेस्ट इंडीज विरूद्धच्या एकदिवसीय संघाची घोषणा केली. या संघाचे नेतृत्व शिखर धवन करणार असून रविंद्र जडेजाला उपकर्णधार करण्यात आले आहे. या मालिकेसाठी संघातील प्रमुख खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे.

असे असले तरी टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार रोहित, पंत आणि पांड्या हे संघासोबत वेस्ट इंडीज असणार आहेत. कारण तीन वनडे सामन्यांच्या मालिकेनंतर भारत पाच टी 20 सामन्यांची मालिका देखील खेळणार आहे. आता भारताची रन मशिन विराट कोहली जो सध्या धावांच्या दुष्काळातून जात आहे, त्याचे टी 20 संघातील भवितव्य (Virat Kohli T20 Career) हे इंग्लंड विरूद्धच्या दोन टी 20 सामने आणि वनडे मालिकेवर अनलंबून असणार आहे. त्यामुळे विराट कोहली भारताच्या वर्ल्डकप टी 20 संघात सहज स्थान मिळवणार की त्याला त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार हे येणारे 10 दिवस ठरवणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवडसमितीत देखील विराट कोहली टी 20 संघातील मध्यल्या फळीत बसतो की नाही याबाबत स्पष्टता दिसत नाही. 'रोहित, पंत आणि पांड्या हे वेस्ट इंडीजमध्ये टी 20 मालिका खेळणार आहेत. बुमराहला विंडीज दौऱ्यावर पूर्ण विश्रांती देण्यात आली आहे. विराट कोहलीचे म्हणाल तर संघ व्यवस्थापन टी 20 वर्ल्डकप संघासाठी काय गरजेचे आहे हे पाहून निर्णय घेतली. इंग्लंडमधील मर्यादित षटकांची मालिका विराट कोहलीसाठी अत्यंत महत्वाची असणार आहे.' अशी माहिती या सूत्रांनी दिली.

भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवडसमिती मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पूर्ण क्षमतेचा भारतीय संघ मैदानात उतरवण्याची योजना आखत आहे. विशेष करून टी 20 सामन्यात इंग्लंड दौऱ्यापासून टी 20 वर्ल्डकपसाठीचा मुख्य संघ मौदानात उरतवण्यात येईल. याचबरोबर मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय वरिष्ठ खेळाडूंना सातत्याने विश्रांती देण्याबाबत नाराज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT