Virat Kohli Twitter Followers : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने नुकतेच दीर्घकाळापासून प्रतिक्षित असलेले 71 वे शतक ठोकले. या शतकानंतर विराट कोहलीचा जवळपास साडेतीन वर्षे सुरू असलेला दुष्काळ संपला. या शतकानंतर विराट कोहलीच्या फॉलोअर्समध्ये देखील वाढ झाल्याचे दिसून आले. आज विराट कोहलीच्या ट्विटर अकाऊंटवरील फॉलोअर्सची संख्या 50 मिलियनच्या (50 कोटी) पुढे गेली. विराटचे ट्विटर अकाऊंट आता फॉलोअर्सच्या बाबतीत भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे अकाऊंट ठरले.
भारतीय ट्विटर अकाऊंटच्या बाबतीत विचार करायचा झाला तर विराट कोहलीपेक्षा भारताच्या पंतप्रधान कार्यालय (PMO) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटचे फॉलोअर्स जास्त आहेत. पीएमओ अकाऊंटचे 50.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट 82.4 मिलियन म्हणजे जवळापास 82 कोटीपेक्षा जास्त जण फॉलो करतात. आता या 50 मिलियन ट्विटर फॉलोअर्स क्लबमध्ये भारताचा रन मशिन विराट कोहली देखील सामील झाला आहे.
विराट कोहली ट्विटवर सर्वाधिक फॉलो होणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा नंबल लागतो. सचिनच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या 37.8 मिलियन इतकी आहे. या दोघांव्यतिरिक्त ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या 100 अकाऊंटच्या यादीत इतर कोणताही क्रिकेटर नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.