क्रीडा

Virat Kohli : Ind vs Pak हायव्होल्टेज सामन्याआधी 'हाई ऑल्टिट्यूड मास्क' घालून कोहली मैदानात

कोहली एक महिन्याच्या ब्रेकनंतर आशिया कपमध्ये पुनरागमन

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानविरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्यासाठी विराट कोहलीने ‘हाय अल्टिट्यूड मास्क’ घालून विशेष तयारी चालू केली आहे. कोहली खास अंदाजात सराव करताना दिसत आहे. विराट कोहली एक महिन्याच्या ब्रेकनंतर आशिया कपमध्ये पुनरागमन करत आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर त्याने निवड समितीकडे विश्रांतीची मागणी केली होती. आशिया कपमध्ये पुनरागमन केल्यानंतर कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती; तर हाँगकाँगविरुद्ध त्याने अर्धशतक झळकाविले होते.

आशिया चषक 2022 च्या टप्प्यातील दोन सामने जिंकून भारताने सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. येथे टीम इंडियाचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 4 सप्टेंबर रोजी होणार आहे. या हाय व्होल्टेज मॅचपूर्वी विराट कोहली स्पेल स्टाईलमध्ये सराव करताना दिसत आहे.

पाकिस्तानविरुद्ध 4 सप्टेंबरच्या सामन्यापूर्वी कोहलीचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो 'हाय अल्टीट्यूड मास्क' घालून धावताना दिसत आहे. हा मास्क फुफ्फुसाची क्षमता वाढवण्यास आणि सुधारण्यास मदत करतो. तसंच स्टॅमिना सुधारतो. यूएईच्या कडक उन्हात हे प्रशिक्षण कोहलीला मैदानावरील इतर खेळाडूंच्या तुलनेत ताजेतवाने ठेवण्यास मदत करेल.

विराट कोहलीने त्याचे नेट सेशन संपवून हे प्रशिक्षण केले. व्हिडिओमध्ये ते सपोर्ट स्टाफच्या देखरेखीखाली हे ट्रेनिंग करताना दिसत आहेत. या दरम्यान तो स्वतःच्या वेळेकडे स्वतः लक्ष देत असल्याचे दिसून येते.

सुपर 4 मध्ये भारताचा पहिला सामना 4 सप्टेंबरला पाकिस्तानशी, त्यानंतर 6 सप्टेंबरला श्रीलंका आणि 8 ऑगस्टला अफगाणिस्तानशी होणार आहे. भारताने तीनपैकी दोन सामने जिंकले तर अंतिम फेरी गाठण्याची शक्यता जास्त आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती 200 पार; महाविकास आघाडीची मोठी निराशा

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT