U Mumba vs Tamil Thalaivas Twitter
क्रीडा

PKL 2021 : U MUMBA नं 30 सेकंदात पलटलेला सामना अखेर बरोबरीत

सुशांत जाधव

U Mumba vs Tamil Thalaivas सलामीच्या सामन्यातील दमदार विजयानंतर पराभवाच्या शोधात असलेल्या यू मुम्बाची प्रतिक्षा कायम राहिली आहे. तमिळ थलायवाजने आणखी एक सामना बरोबरीत सोडवलाय. दोन्ही संघात कांटे की टक्कर झाली. तामिळ थलायवाज विरुद्धच्या सामन्यात पिछाडी भरुन काढत यू मुम्बाने स्पर्धेतील दुसरा विजय नोंदवण्याच्या दिशेनं पाउल टाकले होते. पण अखेरपर्यंत कडवी झुंज देत तमिळ थलायवाजने हातून निसटलेला सामना बरोबरीत रोखण्यात यश मिळवले. पहिल्या हाफमध्ये यू मुम्बाचा संघ 3-15 अशा फरकाने पिछाडीवर होता. 30 सेकंदात घेतलेले 6 पॉइंट्सच्या जोरावर यू मुम्बानं सामन्याला कलाटणी दिली. यू मुम्बाने 30-28 अशी आघाडी घेतली होती. पण अखेरच्या टप्प्यात दोन गुण मिळवत तमिळ थलायवाजने सामना बरोबरीत आणला.

यू मुम्बाकडून व्ही अजिथ कुमारनं (V.AjithKumar) सुपर टेनसह 14 गुणांची कमाई केली. दुसऱ्या बाजूला तमिल थलायवाजच्या मंजितची Manjeet सुपर टेन करण्याची संधी अवघ्या दोन पॉइंट्सने हुकली. तमिल थलायवाज अद्यापही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. तमिळ थलायवाजने तेलुगु टायटन्स विरुद्ध स्पर्धेतील पहिला सामना खेळला होता. हा सामना 40-40 असा बरोबरीत सुटला. दुसऱ्या सामन्यात बंगळुरु बुल्सने त्यांना 38-30 अशा फरकाने पराभूत केले होते.

यु मुम्बाने सलामीच्या लढतीत बंगळुरु बुल्सला 46-30 अशा फरकाने पराभूत करत विजयी सलामी दिली होती. दुसऱ्या सामन्यात दबंग दिल्लीसमोर ते कमी पडले. अटितटिच्या लढतीत दिल्लीने मुंबईला 31-27 अशा फरकाने पराभूत केले होते. तीन सामन्यानंतर आता मुंबईच्या खात्यात एकमेव विजयाची नोंद आहे. दुसरीकडे तमिळ थलायवाजने तीन सामन्यात एक पराभव आणि दोन अनिर्णित सामने खेळले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT