Ire vs Ind T20 Series 
क्रीडा

Ire vs Ind T20 Series: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! बुमराहला आयर्लंड दौऱ्यापूर्वी बसला मोठा धक्का

Kiran Mahanavar

India vs Ireland T20Is : भारतीय क्रिकेट संघाला वेस्ट इंडिजनंतर आयर्लंडचा दौरा करावा लागणार आहे. टीम इंडिया आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. टीम इंडिया आणि आयर्लंड यांच्यात 18, 20 आणि 23 ऑगस्ट रोजी टी-20 मालिका होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे.

भारतीय संघ एका वर्षानंतर पुन्हा आयर्लंडला जात असून पुन्हा टी-20 मालिका खेळणार आहे. वरिष्ठ खेळाडूंशिवाय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्यांचे सपोर्ट स्टाफही या दौऱ्यावर जाणार नाहीत. अशा स्थितीत द्रविडच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षकपदी येईल, असे मानले जात होते. पण आता या दौऱ्यावर भारतीय क्रिकेट संघाला मुख्य प्रशिक्षकाशिवाय जावे लागू शकते, अशी बातमी समोर येत आहे.

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख आणि माजी दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण या दौऱ्यासाठी भारतीय संघासोबत जाणार नसल्याचे एका अहवालात सांगण्यात आले आहे. मागच्या वर्षीही जेव्हा टीम इंडिया आयर्लंडच्या दौऱ्यावर गेली होती तेव्हा व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक म्हणून संघासोबत गेला होता. मात्र, यावेळी सितांशु कोटक आणि साईराज बहुतुले या दिग्गजांना कोचिंग स्टाफचा भाग बनवले जाऊ शकते.

आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचा संघ

जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप. सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.

आयर्लंड विरुद्ध भारत टी20 मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला सामना - 18 ऑगस्ट, मालाहाइड

  • दुसरा सामना - 20 ऑगस्ट, मालाहाइड

  • तिसरा सामना - 23 ऑगस्ट, मालाहाइड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhajinagar Elections: बुलेटची पैज! नेता जिंकेल की नाही यावर कार्यकर्त्यांनी लावली पैज, ५०० रुपयांचा लिहून घेतला बॉण्ड

AUS vs PAK 2nd ODI : 28 वर्षानंतर पाकिस्तान जिंकला! विराटकडून धुलाई झालेला गोलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकला

Latest Maharashtra News Updates : काॅंग्रेसने ओबीसी आणि दलितांना एकमेकांपासून दूर ठेवले, पंतप्रधान मोदींचे वक्तव्य

TET Exam : परीक्षार्थींचे बायोमेट्रिक, फेस स्कॅन; टीईटी परीक्षेची जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाकडून तयारी

मालिकांसाठी नाही तर 'या' साठी भारतात परतली मृणाल दुसानिस, पती नीरजने सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT