क्रीडा

Yuvraj Singh on Rohit Sharma : 'जीवलग मित्राने वर्ल्डकप जिंकलेला पाहायचेय...' सिक्सर किंगने रोहित शर्माचे केले तोंड भरून कौतुक

Yuvraj Singh on Rohit Sharma : रोहित शर्मा हा विचारी कर्णधार आहे. दडपणाखाली तो अचूक निर्णय घेतो आणि त्याची ही क्षमता येत्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाकरिता मोलाची ठरणार आहे.

सकाळ ऑनलाईन टीम

Yuvraj Singh on Rohit Sharma : रोहित शर्मा हा विचारी कर्णधार आहे. दडपणाखाली तो अचूक निर्णय घेतो आणि त्याची ही क्षमता येत्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाकरिता मोलाची ठरणार आहे. माझ्या जीवलग मित्राने हा विश्वकरंडक उंचावलेला मला पाहायचे आहे, असे मत भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने व्यक्त केले.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ५० षटकांच्या विश्वकरंडक स्पर्धेत आणि कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतही अंतिम फेरी गाठली होती. तर २०२२च्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.

भारतीय संघासाठी हुशार, कल्पक आणि दडपणाखाली गडबडून न जाता योग्य निर्णय घेणारा कर्णधार असणे आवश्यक आहे आणि हे सर्व गुण रोहितमध्ये आहेत, असे युवराज म्हणतो. येत्या १ तारखेपासून वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होत असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी युवराज सिंगची सदिच्छा दूत म्हणून आयसीसीने नियुक्ती केली आहे.

रोहितच्या कर्णधारपदी आयसीसी करंडक जिंकण्याचा दुष्काळ संपवण्याची संधी भारताला मायदेशात मिळाली होती. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी अहमदाबाद येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला आणि स्वप्नभंग झाला होता. २०१३ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर आयसीसी करंडक जिंकता आलेला नाही.

मोडके तोडके इंग्रजी

युवराज सिंग २००७ मधील ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेपासून रोहितचा प्रवास जवळून पाहात आहे. या स्पर्धेत रोहितने पदार्पण केले होते. त्यावेळी रोहितचे इंग्रजी अतिशय मोडके तोडके होते, अशी आठवण युवराजने हसत हसत काढली. तो फारच विनोदी आहे. ‘बोरिवलीच्या रस्त्यावरचा खेळाडू’ असे म्हणत मी त्याला नेहमीच चिडवायचो, असे युवराजने सांगितले.

युवराजने आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळला आणि तेथूनच त्याने पूर्ण क्रिकेटला अलविदा केला होता.

रोहित कधीच बदलला नाही

कितीही मोठा खेळाडू झाला किंवा मोठे यश मिळवले तरी रोहितमध्ये कधीच बदल झाला नाही. तोच रोहित कायम राहिला हाच त्याचा गुण फार मोठा आहे. तो नेहमीच संघातील सहकाऱ्यांशी हसत खेळत आणि विनोद करत असतो. माझा तर अतिशय जवळचा मित्र आहे, असे कौतुक युवराजने केले.

विश्वकरंडक जिंकणे हा त्याचा हक्क आहे. त्यामुळे येत्या विश्वकरंडक स्पर्धेत रोहितचा भारतीय संघ जिंकावा, अशी मनोमन इच्छा असल्याचे युवराजने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT