Washington Sundar India vs New Zealand ESAKAL
क्रीडा

IND vs NZ : अर्शदीप महागात पडला! वॉशिंग्टनची सुंदर झुंज विजय मात्र न्यूझीलंडचा

अनिरुद्ध संकपाळ

India vs New Zealand : पहिल्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 21 धावांनी पराभव करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी 177 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताला 20 षटकात 8 बाद 155 धावाच करता आल्या.

अर्शदीपने शेवटच्या षटकात दिलेल्या 27 धावा भारताला महागात पडल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने शेवटपर्यंत झुंज देत 28 चेंडूत 50 धावा केल्या. सूर्यकुमार यादवनेही 47 धावा करत भारताला सामन्यात आणले होते.

न्यूझीलंडकडून कर्णधार मिचेल सँटनर आणि ब्रेसवेलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. फलंदाजीत डॅरेल मिचेलने धडाकेबाज 59 धावा केल्या. डेवॉन कॉन्वेने देखील 52 धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली.

न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेल्या 177 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. भारताने पहिल्या तीन विकेट अवघ्या 15 धावात गमावल्या. शुभमन गिल 7, इशान किशन 4 तर राहुल त्रिपाठी शुन्यावर बाद झाला.

भारताची अवस्था 3 बाद 15 धावा अशी झाली असताना आक्रमक सूर्यकुमार यादव आणि कर्णधार हार्दिक पांड्याने चौथ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचत डाव सारवला. सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्यावर भारताचा डाव पुढे नेण्याची जबाबदारी होती. मात्र ब्रेसवेलला मोठा फटका मारण्याच्या नादात तो 21 धावांवर बाद झाला. पाठोपाठ दीपक हुड्डा 10 चेंडूत 10 धावा करून बाद झाला.

हुड्डा बाद झाला त्यावेळी भारताला 26 चेंडूत 65 धावांची गरज होती. मात्र मावी 2 धावा करून धावबाद झाला. भारताची धावगती मंदावली. मात्र वॉशिंग्टन सुंदर एका बाजूने झुंज देत होता.

12 चेंडूत 50 धावांची गरज असताना सुंदरने 19 व्या षटकात 17 धावा केल्या. आता भारताला शेवटच्या षटकात विजयासाठी 33 धावांची गरज होती. मात्र भारताला 20 षटकात 9 बाद 155 धावांपर्यंतच मजल मारता आली.

तत्पूर्वी, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडने 20 षटकात 6 बाद 176 धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडकडून सलामीवीर डेवॉन कॉन्वेने 35 चेंडूत 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याला डॅरेल मिचेलने 30 चेंडूत नाबाद 59 धावा करत चांगली साथ दिली. मिचेलने अर्शदीप टाकत असलेल्या शेवटच्या षटकात 27 धावा चोपल्या. अर्शदीपने षटकाचा पहिलाच चेंडू नो बॉल टाकला होता. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने 22 धावात 2 बळी घेतले.

(Sports Latest News)

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT