Wasim Akram is very angry with Babar Azam sakal
क्रीडा

Babar Azam : 'मी बाबरच्या जागी असतो तर त्याचा कॅमेरा बंद केला असता', वसीम अक्रम संतापला

बाबर आझमच्या ड्रेसिंग रूमच्या व्हिडिओवर वसीम अक्रम संतापला

सकाळ ऑनलाईन टीम

Wasim Akram on Babar Azam : नेदरलँड्सविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा पराभव आणि बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तानचा संघ टी-20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत पोहोचला. पाकिस्तानशिवाय भारत, न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. तर भारत 10 नोव्हेंबरला इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे.

यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरलमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सेमीफायनल सामन्यापूर्वी ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना संबोधित करत आहे. हा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत ट्विटर आणि यूट्यूब हँडलवरून शेअर केला आहे. आता पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अनुभवी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने बाबर आझमच्या या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने आपल्या खेळाडू सोबत बोलताना दिसला. तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमचे असे मत आहे की, असे व्हिडिओ सार्वजनिक करू नयेत, असे व्हिडिओ नेहमीच गोपनीय ठेवले पाहिजेत. जर मी बाबर आझमच्या जागी असतो तर व्हिडिओ बनवण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीला परवानगी दिली नसती. वसीम अक्रम म्हणतो की, कधी कधी वैयक्तिक गोष्टीही घडतात, त्यामुळे असे करू नये. त्याचवेळी ते म्हणाले की, हे योग्य नाही, पाकिस्तानशिवाय मी इतर कोणत्याही संघाला असे करताना पाहिलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT