Wasim Jaffer Ruturaj Gaikwad MS Dhoni IPL 2023 esakal
क्रीडा

Wasim Jaffer MS Dhoni IPL 2023 : जाफर म्हणतो, धोनी 'या' मराठमोळ्या खेळाडूकडे सोपवणार चेन्नईचे नेतृत्व

अनिरुद्ध संकपाळ

Wasim Jaffer Ruturaj Gaikwad MS Dhoni IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्जचा थला महेंद्रसिंह धोनी भारतीय टी 20 संघाशी जोडला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे महेंद्रसिंह धोनीचा 2023 हा आयपीएलमधील शेवटचा हंगाम असू शकतो. याचाच अर्थ की 2023 नंतर चेन्नई सुपर किंग्जला नवा थला निवडावा लागणार आहे. चेन्नईने नेतृत्व बदलाची चाचपणी 2022 च्या आयपीएल हंगामातच करून पाहिली. मात्र रविंद्र जडेजासोबतचा त्यांचा निर्णय फसला त्यामुळे धोनी नंतर चेन्नईचा कर्णधार (CSK Captain) कोण हा प्रश्न अजूनच गंभीर होत चालला आहे. दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर वसिम जाफरने याबाबत आपला अंदाज व्यक्त केला आहे. त्याचा अंदाज सर्वांनाच आश्चर्य चकित करणारा ठरला आहे.

वसिम जाफर इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना धोनीनंतर सीएसकेमधील बदलाबाबत म्हणाला की, 'विकेटकिपर म्हणून ते डेवॉन कॉनवॉयसोबतच जातील असे मला वाटते. तो धोनी नंतर विकेटकिपिंगची धुरा आपल्या खांद्यावर घेऊ शकतो. महेंद्रसिंह धोनी अजून एखादा विकेटकिपर देखील बघू शकतो. तो कोण असेल हे मला माहिती नाही. याचबरोबर संघ व्यवस्थापन धोनीनंतर सीएसकेचे नेतृत्व कोण करणार यावरही विचार करत असतील. त्यांच्या डोळ्यासमोर काही खेळाडू असतील. ऋतुराज गायकवाड हा त्यापैकी एक असू शकतो. कारण तो तरूण आहे. तो सध्या महाराष्ट्राचे देखील नेतृत्व करत आहे. त्यामुळे सीएसके त्याच्यावर जबाबदारी टाकून आपला पुढचा कर्णधार म्हणून तयार करतील.'

चेन्नई सुपर किंग्जने काही खेळाडूंना रिलीज करत आपल्या पर्समध्ये 20 कोटी 45 लाख रूपये जमा केले आहेत. सीएसके या पैशातून दोन विदेशी खेळाडूंची कमतरता भरून काढण्याची शक्यता आहे. सीएसकेने ड्वेन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा, अॅडम मिल्ने, हारी निशान्थ, ख्रिस जॉर्डन, भगत वर्मा, केएम आसिफ, नारायण जगदीशन यांना रिलीत केले आहे. तर चेन्नईन राजवर्धन हंगरगेकर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी आणि सुभ्रांशू सेनापती यांना 2023 च्या हंगामासाठी रिटेन करून ठेवले आहे.

याबाबत वसिम जाफर म्हणतो की, 'मला आशा आहे की ज्या खेळाडूंना रिटेन केले आहे त्यांना यंदा संधी मिळेल. कारण ते धोनीसोबत हा शेवटचा हंगाम खेळणार आहेत. त्यामुळे त्याचा सहवास लाभावा यासाठी त्यांना संधी मिळायला हवी. यामुळे एक चांगला खेळाडू होणं आणि सीएसकेची लेगसी पुढे नेण्यास त्यांना मदत होईल. त्यामुळे भारतीय तरूण खेळाडूंनींना आता जबाबदारी घ्यावी. दुबेने काही हंगाम त्याच्या नेतृत्वाखाली खेळले आहेत. मात्र हंगरगेकर, सुभ्रांशू यांनी आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही. आता या खेळाडूंना धोनीसोबत खेळून त्याच्याकडून शिकून घेणे आणि एक चांगला खेळाडू होण्याची ही शेवटची संधी आहे. आपल्यासमोर दीपक चाहर, ऋतुराज गायकवाड यांची उदाहरणे आहेत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT