क्रीडा

Rohit Sharma : गांगुली, धोनीसारख्या दिग्गज कर्णधारांना जमलं नाही ते रोहितने करून दाखवलं; पाहा Video

या सामन्यात भारतीय संघाने पुन्हा 160 धावांनी शानदार विजय मिळवला.

रोहित कणसे

भारतीय संघाने दिवाळीत वर्ल्डकप स्पर्धेतील शेवटचा लीग टप्प्यातील सामना नेदरलँड्सविरोधात खेळला. या सामन्यात भारतीय संघाने पुन्हा 160 धावांनी शानदार विजय मिळवला. टीम इंडीयाचा 9 सामन्यांत सलग 9वा विजय आहे. संघातील प्रत्येक खेळाडूने शानदार कामगिरी केली असला तरी विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी हा दिवस खूप खास होता.

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकात 4 विकेट गमावून 410 धावा केल्या होत्या. याच्या प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ 250 धावांवर ऑलआऊट झाला. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मालाही प्रत्येकी एक विकेट मिळाली. याआधी विराटने 2014 मध्ये न्यूझीलंडमध्ये शेवटची विकेट घेतली होती तर रोहित शर्माने 2012 मध्ये वनडे सामन्यात शेवटची विकेट घेतली होती. या सामन्यात विराटने नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्डसला तर रोहितने तेजा निदामनुरूला बाद केले.

यासह रोहित शर्मा 1983 नंतर विश्वचषकाच्या एकाच सामन्यात 50 धावा आणि 1 बळी घेणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. यापूर्वी 1983 च्या विश्वचषकात महान कर्णधार कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध 175 धावांची खेळी केली होती आणि 1 विकेटही घेतला होता.

काय घडलं मॅचमध्ये?

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय अगदी योग्य ठरला. रोहित आणि शुभमनने संघाला शतकी सुरुवात करून दिली. रोहितने 61 धावांची, शुभमनने 51 धावांची खेळी खेळली. या दोघांनंतर विराट कोहली पुन्हा आपल्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला. त्यानेही 51 धावांचे योगदान दिले. मात्र यानंतर श्रेयस अय्यर (128) आणि केएल राहुल (102) यांनी शतकी खेळी करत संघाला 410 धावांपर्यंत पोहोचवले.

या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना नेदरलँडचा संघ सामन्यात विशेष काही करू शकला नाही. संपूर्ण संघ 47.5 षटकात 250 धावा करून सर्वबाद झाला होता. नेदरलँडसाठी तेजा निदामनुरूने 45 धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत बुमराह, सिराज, कुलदीप, जडेजा या सर्वांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतले. भारतीय संघ आता 15 नोव्हेंबरला न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरी खेळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT