Yogeshwar Dutt  Sakal
क्रीडा

Yogeshwar Dutt : खडतर काळ पण कुस्तीमध्ये पदक मिळवण्याची परंपरा कायम राहणार; माजी ऑलिंपिकपटूला विश्वास

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : बीजिंग ऑलिंपिक २००८ पासून भारतीय कुस्तीपटूंनी सलग चार ऑलिंपिकमध्ये पदकावर नाव कोरले आहे. बीजिंग, लंडन, रिओ दी जेनेरियो व टोकियो या सलग ऑलिंपिकमध्ये भारतीय कुस्तीपटूंनी सहा पदकांची लूट केली. कुस्तीमधील पदक पटकावण्याची परंपरा पॅरिसमध्येही कायम राहील, असा विश्‍वास भारताचा माजी ऑलिंपिक पदकविजेता योगेश्‍वर दत्त याने व्यक्त केला.

सुशीलकुमारने २००८ मधील ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक पटकावले. त्यानंतर २०१२ मधील लंडन ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक पटकावण्यात त्याला यश मिळाले. याच ऑलिंपिकमध्ये योगेश्‍वर दत्त याने ब्राँझपदकाची कमाई केली.

२०१६ मधील रिओ ऑलिंपिकमध्ये साक्षी मलिकने ब्राँझपदक पटकावले. अखेर २०२० मधील टोकियो ऑलिंपिकमध्ये रवी दहीया याने रौप्यपदकावर नाव कोरले व बजरंग पुनियाने ब्राँझपदक जिंकले.

भारतीय कुस्तीपटूंच्या ऑलिंपिकमधील यशाबाबत योगेश्‍वर दत्त म्हणाला, पॅरिसमध्ये भारताचे सहा कुस्तीपटू सहभागी होत आहेत. यामध्ये पाच महिला खेळाडूंचा सहभाग आहे. अंतिम पंघाल व रीतिका हूडा या दोन युवा महिला कुस्तीपटू आहेत. या दोन्ही खेळाडूंकडून पदक जिंकण्याच्या आशा आहेत. भारताची कुस्ती या खेळातील पदक जिंकण्याची परंपरा या दोघी कायम राखतील, असे ठाम मत पुढे त्याने व्यक्त केले.

खडतर काळ

योगेश्‍वर दत्त पुढे खंत व्यक्त करतो की, गेल्या दोन वर्षांमध्ये कुस्तीपटूंच्या संघटनेतील माजी प्रमुखाविरुद्धच्या आंदोलनामुळे भारतीय कुस्तीला खडतर काळामधून जावे लागले आहे. ही बाब क्लेशदायक आहे. यामुळे खेळाच्या विकासालाही ब्रेक लागला आहे.

फक्त एक पुरुष खेळाडू पात्र

योगेश्‍वर दत्त म्हणाला, अथेन्स ऑलिंपिकपासून प्रत्येक ऑलिंपिकमध्ये पात्र ठरणाऱ्या कुस्तीपटूंची संख्या अधिक असते. यंदा मात्र सहा पात्र ठरलेल्या कुस्तीपटूंपैकी फक्त एक पुरुष खेळाडू आहे. अमन सेहरावत याने पॅरिस ऑलिंपिकची पात्रता मिळवली आहे.

याप्रसंगी महिला कुस्तीपटूंचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. पाच महिला ऑलिंपिकसाठी पात्र ठरल्या आहेत. भारतीय कुस्तीपटू यंदा किमान दोन पदके जिंकतील, असे मत त्याने पुढे व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT