West Indies India ODI Series West Indies ODI Team Announce esakal
क्रीडा

IND vs WI : भारताविरूद्धच्या मालिकेसाठी विंडीज संघाची घोषणा; पूरन कॅप्टन

अनिरुद्ध संकपाळ

IND vs WI Series : इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिका 2 - 2 अशी बरोबरी तर वनडे आणि टी 20 मालिका 2 - 1 अशी जिंकल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारत तीन वनडे सामने आणि पाच टी 20 सामने खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारताचा वनडे आणि टी 20 संघ यापूर्वीच जाहीर झाला आहे. आता वेस्ट इंडीजनेही आपल्या वनडे संघाची घोषणा केली आहे.

वेस्ट इंडीजच्या संघात अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरने पुनरागमन केले आहे. होल्डरला बांगलादेश विरूद्धच्या मालिकेत वर्कलोड नुसार विश्रांती देण्यात आली होती. वेस्ट इंडीजमध्ये नुकत्याच खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेत विंजीडला बांगलादेशने 3 - 0 असा क्लीन स्विप दिला. तर विंडीजने टी 20 आणि कसोटी मालिकेत बांगलादेशला क्लीन स्वीप दिला होता.

भारताविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी वेस्ट इंडीज संघाचे नेतृत्व निकोलस पूरन करणार आहे. तर उपकर्णधार म्हणून शाई होपची निवड करण्यात आली आहे.

वेस्ट इंडीजचा वनडे संघ :

निकोलस पूरन (कर्णधार), शाई होप (उपकर्णधार), जेसन होल्डर, शमर ब्रुक्स, किसी कार्टी, रोव्हमन पॉवेल, अकील होसेन, अल्जारी जोसेफ, ब्रँडन किंग, काईल मेयर्स, गुडकेश मोती, किमो पॉल आणि जेडन सील्स.

विंडीज विरूद्धच्या वनडे मालिकेत शिखर धवन कर्णधार

वेस्ट इंडीज विरूद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय संघाचे नेतृत्व शिखर धवन करणार असून रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. संघाचा उपकर्णधार रविंद्र जडेजा असणार आहे.

भारतीय वनडे संघ

शिखर धवन (कर्णधार), रविंद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह.

वेस्ट इंडीज - भारत वनडे मालिका

पहली वनडे- 22 जुलै, रात्री 7 वाजता

दुसरी वनडे- 24 जुलै, रात्री 7 वाजता

तिसरी वनडे- 27 जुलै, रात्री 7 वाजता

वेस्ट इंडीज - भारत टी 20 मालिका

पहिला टी-20 - 29 जुलै

दुसरा टी-20 - 1 ऑगस्ट

तीसरा टी-20 - 2 ऑगस्ट

चौथा टी-20 - 6 ऑगस्ट

चाचवा टी-20 - 7 ऑगस्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT