West Indies Team T20 World Cup 2022 Announces 
क्रीडा

T20 World Cup : दिग्गज आंद्रे रसेलला डच्चू; वेस्ट इंडिजचा संघ जाहीर

Kiran Mahanavar

West Indies Team T20 World Cup 2022 Announces : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी T20 विश्वचषकासाठी वेस्ट इंडीजच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. वेस्ट इंडिजने T20 विश्वचषकासाठी आपल्या 15 जणांच्या संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश केलेला नाही. इंडिजने बुधवारी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी T20 विश्वचषकासाठी त्यांचा संघ जाहीर केला, मात्र या संघात अनेक बड्या खेळाडूंची नावे नसल्यामुळे दिग्गज आश्चर्यचकित झाले आहेत.

वेस्ट इंडिजने T20 विश्वचषकासाठी त्यांच्या 15 सदस्यीय संघात अष्टपैलू आंद्रे रसेल आणि सुनील नरेन यांसारख्या खेळाडूंची निवड केलेली नाही. मात्र स्फोटक सलामीवीर एविन लुईस या संघात स्थान मिळाले आहे. एविन लुईस 2021 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाचा भाग होता, परंतु तेव्हापासून तो संघाबाहेर आहे. याशिवाय यानिक कॅरिया आणि रेमन रीफर या अनकॅप्ड युवा खेळाडूंनाही संधी मिळाली आहे.

दोन वेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिज विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाशी दोन सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे. त्यानंतर 17 ऑक्टोबर रोजी संघाचा पहिला सामना स्कॉटलंडशी होईल. वेस्ट इंडिज संघाला क्वालिफायर सामने खेळायचे आहेत.

T20 विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजचा संघ :

निकोलस पूरन (कर्णधार), रोवमॅन पॉवेल, यानिक कारिया, जॉनसन चार्ल्स, शेल्डन कॉट्रेल, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, अकील होसेन, अल्जारी जोसेफ, ब्रँडन किंग, एविन लुईस, काइल मेयर्स, ओबेद मॅककॉय, रेमन रेफर, ओडियन स्मिथ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधींची प. महाराष्ट्रात राजकीय मशागत; सांगलीनंतर एकाच महिन्यात कोल्हापूर दौरा, नेमकं काय घडणार?

'सारं काही तिच्यासाठी' फेम खुशबू तावडे दुसऱ्यांदा झाली आई; दिला गोंडस बाळाला जन्म; मुलगा की मुलगी?

Assembly Elections 2024 : तुमचं बर हाय, आमची फरपट कवा थांबणार? भोकर मतदारसंघात भावी आमदारांची गर्दी, मूलभूत गरजांची वाणवा

Navratri Recipe : नवरात्रीचा उपवास! सोप्या पद्धतीने घरी बनवा पौष्टिक उपवासाची खांडवी

Elon Musk: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X आर्थिक संकटात; इलॉन मस्कला मोठे नुकसान, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT