त्रिनिदाद : भारताने पहिल्या वनडे सामन्यात वेस्ट इंडीजचा अवघ्या 3 धावांनी पराभव करत मालिकेत 1 -0 अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने विंडीजसमोर विजयासाठी 309 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र वेस्ट इंडीजला 50 षटकात 6 बाद 305 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून शिखर धवनने 97 तर शुभमन गिल (64), श्रेयस अय्यर (54) यांनी अर्धशतकी खेळी केली. विंडीजकडून कायल मायेर्सने 75 धावा केल्या. तर ब्रँडन किंगने 54 धावांची खेळी केली. भारताकडून मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
पहिल्या वनडेत भारताने यजमान वेस्ट इंडीजचा अवघ्या 3 धावांनी विजय मिळवला. भारत आता मालिकेत 1 - 0 ने आघाडीवर आहे.
शार्दुल ठाकूरने ब्रुक्सला बाद केल्यानंतर 68 चेंडूत 75 धावा करणाऱ्या कायल मायेर्सला देखील बाद करत दुसरा सेट झालेला फलंदाज पॅव्हेलियनमध्ये धाडला.
दुसऱ्या विकेटसाठी 117 धावांची शतकी भागीदारी करणाऱ्या मायेर्स - ब्रुक्सची जोडी अखेर शार्दुल ठाकूरने फोडली. त्याने ब्रुक्सला 46 धावांवर बाद केले.
अवघ्या 16 धावांवर पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर वेस्ट इंडीजने आपला डाव सावरला. कायल मायेर्स आणि शामराह ब्रुक्सने दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचत संघाला शतकी मजल मारून दिली.
मोहम्मद सिराजने शाय होपला 7 धावांवर बाद करत विंडीजला पहिला धक्का दिला.
दीपक हुड्डाने 27 धावांची खेळी करत अक्षर पटेलबरोबर सहाव्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी रचली. यामुळे भारताने 308 धावा केल्या. मात्र अलझारी जोसेफने दीपक हुड्डाला देखील बाद केले.
भारताची अवस्था 5 बाद 252 झाली असताना दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांनी डाव सावरत सहाव्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी रचली. मात्र ही जोडी अल्झारी जोसेफने फोडली. त्याने 21 धावा करणाऱ्या अक्षर पटेलला बाद केले.
भारताचा निम्मा संघ 252 धावांवर माघारी गेला. संजू सॅमसन 12 धावा करून बाद झाला.
भारताने दमदार सुरूवातीनंतर तीन फलंदाज स्वस्तात गमावले. शिखर धवन, श्रेयस अय्यर नंतर सूर्यकुमार यादव देखील 13 धावांची भार घालून परतला.
शिखर धवन बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र त्यानंतर तो 57 धावांवर बाद झाला.
भारताचा कर्णधार शिखर धवन शतकाच्या समिप आला असताना त्याला गुडाकेश मोटियेने 97 धावांवर बाद केले. शिखर बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने आपले अर्धशतक पूर्ण केले.
भारताने 32 व्या षटकात आपले द्विशतक पार केले. शिखर धवनने नव्वदी तर श्रेयस अय्यरने चाळीशी पार केली आहे.
कर्णधार शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांच्यातील 50 धावांची भागीदारी. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत धवनच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात धवनने अर्धशतक झळकावले आणि आता 80च्या जवळपास धावा केल्या आहेत.
भारताला पहिला धक्का शुभमन गिलच्या रूपाने बसला आहे. गिल 64 धावा करून धावबाद झाला. श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला आहे.
पहिली विकेट मिळविण्यासाठी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना कसरत करावी लागत आहे. गिल अर्धशतकांसह खेळत आहे. धवन 41 धावावर खेळत आहे
भारताचा सलामीवीर शुभमन गिलने एकदिवसीय क्रिकेटमधील ठोकले पहिले अर्धशतक. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने 36 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावले.
दहा षटकांचा खेळ पूर्ण झाला. सध्या भारताची धावसंख्या एकही न गमावता 73 धावा आहे. कर्णधार शिखर धवन 28 आणि शुभमन गिल 41 धावा करून खेळत आहेत.
भारताच्या 50 धावा सातव्या षटकात पूर्ण झाल्या. गिल 17 चेंडूत 22 आणि धवन 25 चेंडूत 24 धावांवर नाबाद आहे. वेस्ट इंडिजचे गोलंदाज सातत्याने खराब गोलंदाजी करत आहेत.
भारताचा सलामीवीर शुभमन गिल आणि कर्णधार शिखर धवन डावाची सुरुवात करण्यासाठी क्रीझवर आले आहेत. जोसेफच्या पहिल्याच षटकात धवनने लागोपाठच्या चेंडूंमध्ये दोन चौकार मारले.
भारत : शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सैमसन, दीपक हुड्डा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा।
वेस्टइंडीज : शाई होप, ब्रैंडन किंग, शामराह ब्रूक्स, निकोलस पूरन, रोवमन पॉवेल, अकील हुसैन, रोमारियो शेफर्ड, कायेल मेयर्स, गुडाकेश मोती, अल्जारी जोसेफ, जेडेन सिल्स।
वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. निकोलस प्रथमच घरच्या मैदानावर वनडेमध्ये संघाचे नेतृत्व करत आहे.
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिला वनडे सामना आजपासून सुरू होत आहे. भारताचे नेतृत्व शिखर धवन तर विंडीजचे नेतृत्व निकोलस पूरन करणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.