West Indies vs India 1st Test  esakal
क्रीडा

West Indies vs India 1st Test : यशस्वीची चौकाराने सुरू झाली आंतरराष्ट्रीय कारकीर्द, रोहिसोबत दिली नाबाद अर्धशतकी सलामी

अनिरुद्ध संकपाळ

West Indies vs India 1st Test News : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्याच दिवशी भारताने वेस्ट इंडीजचा पहिला डाव 150 धावात गुंडाळला. भारताकडून फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने 60 धावात 5 विकेट्स घेतल्या. तर रविंद्र जडेजाने 26 धावात 3 विकेट्स घेतल्या. विंडीजकडून अलिक अथिनाजेने सर्वाधिक 47 धावा केल्या.

भारताने आपल्या पहिल्या डावात दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद 80 धावा केल्या होत्या. पदार्पण करणारा यशस्वी जैसवाल 40 तर रोहित शर्मा 30 धावा करून नाबाद होते.

भारताने आपला पहिला डाव सुरू केला त्यावेळी कर्णधार रोहित शर्माने आक्रमक सुरूवात केली. मात्र कसोटी पदार्पण करणारा यशस्वी जैसवाल हा संथ गतीने खेळत होता. मात्र पहिले 15 चेंडू खेळल्यानंतर त्यानेही अल्झारी जोसेफला दोन कडक पूल शॉट मारत चौकाराने आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू केली.

या चौकारानंतर जैसवालने धावांची गती चांगली राखत धावा करण्याच्या बाबतीत रोहितला ही मागे टाकले होते. मात्र नंतर रोहितने आकर्षक फटकेबाजी करत भारताला 13 व्या षटकात अर्धशतक पार करून दिले. यशस्वीने पहिल्याच सामन्यात रोहितसोबत नाबाद अर्धशतकी सलामी दिली.

सामन्याचा पहिला दिवस संपला त्यावेळी भारताने बिनबाद 80 धावा केल्या होत्या. यशस्वी जैसवाल 40 तर रोहित शर्मा 30 धावांवर खेळत होता. भारत अजून 70 धावांनी पिछाडीवर आहे.

यशस्वी जैसवालने चौकार मारत केली सुरूवात 

कसोटी पदार्पण करणारा यशस्वी जैसवाल हा संथ गतीने खेळत होता. मात्र पहिले 15 चेंडू खेळल्यानंतर त्यानेही अल्झारी जोसेफला दोन कडक पूल शॉट मारत चौकाराने आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू केली.

137-8 (58 Ov) : भारताची पकड मजबूत

दुसऱ्या सत्रात भारताने विंडीजच्या चार विकेट्स घेत विंडीजची अवस्था 8 बाद 137 धावा अशी केली.

124-7 : अश्विनने विंडीजला दिला सातवा धक्का

वेस्ट इंडीजचा निम्मा संघ 76 धावांवर गारद झाल्यानंतर जेसन होल्डर आणि अलिक अथनाजेने डाव सावरत संघाला शतकी मजल मारून दिली. मात्र मोहम्मद सिराजने जेसन होल्डरला 18 धावांवर बाद केले.

त्यानंतर आलेल्या अल्झारी जोसेफला अश्विनने फिरकीच्या जाळ्यात अडकवत 4 धावांवर बाद केले. अश्विनची ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 700 वी विकेट ठरली. त्यानंतर अश्विनने 47 धावांची झंजार खेळी करणाऱ्या अथनाजेचा देखील अडसर दूर केला.

76-5 : विंडीजचा निम्मा संघ गारद 

पहिल्या सत्रात विंडीजचे चार फलंदाज पॅव्हेलियनमध्ये धाडल्यानंतर रविंद्र जडेजाने दुसऱ्या सत्राची सुरूवात देखील विकेटने केली. त्याने जोशुआला 2 धावांवर बाद करत विंडीजला पाचवा धक्का दिला.

WI 50/3 (21) : शार्दुलनेही खाते उघडले

शार्दुल ठाकूरने रेमंड रेफरला 2 धावा करून शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर बाद झाला.

38-2 : दुसऱ्या सलामीवीराचीही शिकार 

रविचंद्रन अश्विनने विंडीजचा दुसरा सलामीवीर क्रेग ब्रेथवेटला 20 धावांवर बाद करत दुसरा सलामीवीर देखील पॅव्हेलियनमध्ये धाडला. अश्विनने ब्रेथवेटला पाचव्यांदा बाद केले.

विंडीजला पहिला धक्का 

अश्विनने अखेर विंडीजची सलामी जोडी फोडली. त्याने तेगनारायण चंद्रपॉलचा 12 धावांवर त्रिफळा उडवत भारताला पहिले यश मिळवून दिले.

WI 29/0 (10) : विंडीजच्या सलामीवीरांचा कडावा प्रतिकार

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडीजने पहिल्या 10 षटकात 29 धावांपर्यंत मजल मारली. विशेष म्हणजे वेस्ट इंडीजचे सलामीवीर क्रेग ब्रेथवेट आणि तेगनारायण चंद्रपॉल यांनी भारताचा वेगवान मारा यशस्वीरित्या खेळून काढला.

भारताची प्लेईंग 11

यशस्वी जैसवाल आणि इशान किशन यांना कसोटी पदार्पणाची संधी मिळाली असून शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे.

वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकली

वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यशस्वी जैसवाल, इशान किशनला कसोटी पदार्पणाची संधी.

यशस्वीचा मार्ग झाला मोकळा?

रोहित शर्माने सांगितल्या प्रमाणे शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. त्यामुळे यशस्वी जैसवालचा रोहित शर्मासोबत सलामीला येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याची कसोटी पदार्पणाची शक्यता निर्माण झाली आहे.

शुभमन गिलनेच केली मागणी 

रोहित शर्मा म्हणाला की, शुभमन गिलने प्रशिक्षक राहुल द्रविडकडे तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची विनंती केली होती. तो म्हणाला होता की मी कायम तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. मला वाटते मी तिथे चांगली कामगिरी करू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election Voting 2024: शंभरी पार केलेल्या वृद्धांमध्ये मतदानाचा उत्साह; तुम्ही बजावला का लोकशाहीचा हक्क?

Baramati: राष्ट्रवादी व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यात बाचाबाची; शर्मिला पवार व अजित पवारही पोहोचले मतदान केंद्रावर...

नेमकं प्रकरण काय? ए आर रहमानच्या घटस्फोटानंतर त्याच्या ग्रुपमधील गिटारीस्ट मोहिनी डेदेखील पतीपासून विभक्त

"तो व्रण कायमच मला..." परदेशात गंभीर जखमी झालेल्या अभिनेत्रीने पोस्टमधून सांगितली हेल्थ अपडेट ; "चेहरा विद्रुप झाला.."

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: मिरा भाईंदरमध्ये मेहता आणि जैन यांचे कार्यकर्ते भिडले

SCROLL FOR NEXT