India Vs West Indies 2nd T20I  esakal
क्रीडा

WI vs IND 2nd T20I : निकोलस पूरनने भारताला धुतलं; दुसरा सामनाही हातातून निसटला

अनिरुद्ध संकपाळ

India Vs West Indies 2nd T20I : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यात देखील भारताला पराभवाचीच चव चाखावी लागली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने विंडीजसमोर विजयासाठी 153 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र हे आव्हान विंडीजने 2 विकेट्स राखूनच पार केले.

निकोलस पूरनची 67 धावांची खेळी अकील हुसैन (नाबाद 14 धावा) आणि अल्झारी जोसेफ (नाबाद 10 धावा) यांनी वाया जाऊ दिली नाही. भारताकडून कर्णधार हार्दिक पांड्याने 3 तर युझवेंद्र चहलने 2 विकेट्स घेतल्या

तत्पूर्वी, भारताने वेस्ट इंडीज विरूद्धाच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 7 बाद 152 धावा केल्या. भारताकडून युवा फलंदाज तिलक वर्माने पहिल्या टी 20 सामन्याप्रमाणे दुसऱ्याही सामन्यात दमदार खेळी केली. 20 वर्षाच्या तिलकने दुसऱ्याच सामन्यात आपले पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठोकले.

तिलक वर्मा सोडला तर इतर भारतीय फलंदाजांनी निराशाच केली. सूर्यकुमार यादव तर 1 धाव करून धावबाद झाला अन् संजूने 7 धावांचे योगदान देत पॅव्हेलियन गाठले. इशान किशनने 27 तर हार्दिक पांड्याने 24 धावांचे योगदान दिले. विंडीजकडून अकील हुसैन आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

भारताचे जोरदार पुनरागमन 

निकोलस पूरन क्रिजवर होता तेव्हा विंडीतने 14 षटकात 4 बाद 127 धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र मुकेश कुमारने 40 चेंडूत 67 धावा करणाऱ्या पूरनला बाद केलं अन् विंडीजचा डाव घसरला.

रोमारियो शेफर्ड शुन्यावर धावबाद झाला. त्यानंतर युझवेंद्र चहलने जेसन होल्डरला शुन्यावर स्टम्पिंग बाद केले. 16 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर युझवेंद्र चहलने 22 धावा करणाऱ्या हेटमायरला बाद करत विंडीचा आठवा फलंदाज 129 धावांवर माघारी धाडला.

निकोलस पूरनसमोर भारतीय गोलंदाज हतबल

हार्दिक पांड्याने वेस्ट इंडीजला पाठोपाठ दोन धक्के दिल्यानंतर कायल मेयर्स आणि निकोलस पूरन यांनी विंडीजचा डाव सावरला. त्यांनी आक्रमक फलंदाजी करत पॉवर प्लेचा चांगला उपयोग करून घेतला.

निकोलस पूरनने त्यानंतरही आपला धडाका कायम ठेवत फक्त 29 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. त्याला मेयर्सने 15 तर कर्णधार रोव्हमन पॉवेलने 21 धावांची साथ दिली. पूरनच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे विंडीजने 12 व्या षटकातच शतक पार केले.

पहिल्याच चेंडूवर विंडीजला धक्का 

भारताचे 153 धावांचे आव्हान घेऊन मैदानात आलेल्या विंडीजला हार्दिक पांड्याने पहिल्याच चेंडूवर ब्रँडन किगला बाद केले.

भारताचे विंडीजसमोर 153 धावांचे आव्हान 

13-4 (15.2 Ov) : तिलक वर्माचं दमदार अर्धशतक 

तिलक वर्माने आपल्या दुसऱ्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात तिलक वर्माने अर्धशतक ठोकत आपल्या कारकिर्दीची धडाकेबाज सुरूवात केली.

IND 18/2 (3.3) सूर्या धावबाद 

भारतीय संघ शुभमन गिलच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच विंडीजने भारताला दुसरा धक्का दिला. स्टार सूर्यकुमार यादवला अवघ्या 1 धावेवर धावबाद करत भारताची अवस्था 2 बाद 18 धावा अशी केली.

भारताला पहिला धक्का 

वेस्ट इंडीजने दुसऱ्या टी 20 सामन्यात तिसऱ्या षटकातच भारताला पहिला धक्का दिला. अल्झारी जोसेफने सलामीवीर शुभमन गिलला 7 धावांवर बाद करत आपला 100 वा टी 20 बळी टिपला.

हार्दिकने नाणेफेक जिंकली

हार्दिक पांड्याने अखेर विंडीजमध्ये नाणेफेक जिंकली आहे. त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात एक बदल आहे. कुलदीप यादवला सरावावेळी छोटी दुखापत झाली असून त्याच्या ऐवजी संघात रवी बिश्नोईला संधी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North Assembly Election 2024 Results : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे पडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT