West Indies vs India 4th T20I Live Cricket Score Highlights esakal
क्रीडा

WI vs IND 4th T20I: चौथ्या सामन्यात भारताने विंडीजचा केला 59 धावांनी पराभव

अनिरुद्ध संकपाळ

West Indies vs India 4th T20I : भारताने वेस्ट इंडीजला चौथ्या टी 20 सामन्यात 59 धावांनी मात देत मालिकेत 3 - 1 अशी विजयी आघाडी घेतली. भारताने वेस्ट इंडीज समोर विजयासाठी 192 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र विंडीजचा संघ 132 धावात ढेर झाला. भारताकडून आवेश खान, अक्षर पटेल आणि रवी बिश्नोईने 2 विकेट घतल्या. भारताकडून ऋषभ पंतने 44 तर संजू सॅमसनने नाबाद 30 धावा केल्या. रोहितनेही तडाखेबाज 33 धावा केल्या.

विंडीजचा निम्मा संघ 82 धावात माघारी

भारताने वेस्ट इंडीजची अवस्था 9 षटकात 5 बाद 82 अशी केली.

भारताच्या 20 षटकात 191 धावा 

भारताकडून ऋषभ पंतने 44 धावांची खेळी करत मधल्या फळीत डाव सावरण्याचे काम केले. त्यानंतर स्लॉग ओव्हरमध्ये संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. सॅमसनने 23 चेंडूत नाबाद 30 धावा केल्या. तर अक्षर पटेलने 8 चेंडूत नाबाद 20 धावा केल्या.

61-2 : सूर्यकुमार यादव देखील माघारी

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर दुसरा सलामीवीर सूर्यकुमार यादव देखील 14 चेंडूत 24 धावा करून बाद झाला.

53-1: भारताला पहिला धक्का

भारताला पहिला धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्माला अकील हुसैनने बाद केले. रोहितने 13 चेंडूत आक्रमक 33 धावा केल्या.

भारतीय संघात तीन बदल

भारताने चौथ्या टी 20 सामन्यासाठी संघात तीन बदल केले आहेत. हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन आणि श्रेयस अय्यर यांच्या जागी रवी बिश्नोई, अक्षर पटेल आणि संजू सॅमसन यांना संघात स्थान देण्यात आले आहे.

वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकली

वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

वेट आऊट फिल्डमुळे नाणेफेकीत उशीर

पावसामुळे फ्लोरिडाचे मैदान ओले झाले आहे. त्यामुळे नाणेफेकीस विलंब होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी कायम राहणार का? जाणून घ्या आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Jammu Kashmir : ...तर काश्मीरमध्ये वेगळी स्थिती असती; उमर अब्दुल्लांकडून वाजपेयींची तोंडभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

SCROLL FOR NEXT