नवी दिल्ली : भारताने वेस्ट इंडीज (West Indies Vs India) विरूद्धच्या वनडे मालिकेत 2 - 0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताने (Indian Cricket Team) या वर्षातील सलग तिसरी वनडे मालिका जिंकली आहे. यापूर्वी भारताने इंग्लंडला त्यांच्या मायदेशातच पराभवाची धूळ चारली. तर फेब्रुवारी महिन्यात भारतात झालेल्या वेस्ट इंडीज विरूद्धच्या मालिकेत भारताने विंडीजला क्लीन स्विप दिला होता. मात्र भारताला दक्षिण आफ्रिकेविरूद्धची वनडे मालिका गमवावी लागली.
भारताने गेल्या काही काळापासून आपल्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देत आपली बेंच स्ट्रेंथ देखील तपासून पाहिली आहे. वनडे मालिकेतील निकालावर नजर टाकली तर टीम इंडियाची बेंच स्ट्रेंथ तगडी असल्याचे दिसून येते. मात्र विंडीज दौऱ्यावर टीम इंडियातील एक कच्चा दुवा (Weakness) समोर आला आहे.
भारताने मधल्या षटकात सरासरी 4 विकेट गमावल्या
भारताने जरी सलग तीन वनडे मालिका जिंकल्या असल्या तरी टीम इंडियाच्या मधल्या फळीत समस्या आहे. वेस्ट इंडीज विरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भाताने 11 ते 40 षटकात 170 धावा केल्या. मात्र या दरम्यान भारताने 5 विकेट देखील गमावल्या होत्या. पहिल्या वनडे सामन्यात देखील 175 धावा केल्या मात्र 4 विकेट गमावल्या. या वर्षी जर टीम इंडियाने 11 ते 40 षटकात जवळपास 46 विकेट गमावल्या आहेत.
वर्ल्डकप पूर्वी कामगिरी सुधारावी लागले
भारतीय संघ पुढच्या वर्षी मायदेशात वनडे वर्ल्डकप खेळणार आहे. त्यामुळे संघातील स्टार फलंदाज विराट कोहली फॉर्ममध्ये यायला हवा. भारताच्या मधल्या फळीत विराट कोहली हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे. जर त्याची बॅट तळपली तर क्रमांक 4,5 आणि 6 वर फलंदाजीसाठी येणाऱ्या खेळाडूंवर दबाव येत नाही. ते आपला नैसर्गिक फलंदाजी करू शकतात.
इंग्लंडविरूद्धच्या वनडे मालिकेत हे दिसून आले आहे. भारताने दुसरा सामना गमावला होता. या सामन्यात विराटसह टॉपचे तीन फलंदाज फेल गेले होते. त्यांनी फक्त 25 धावा केल्या होत्या. यामुळे मधल्या फळीवर दबाव आला होता. अपेक्षित धावगती न राखल्यामुळे भारताला 247 धावांचे आव्हान देखील पार करता आले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.