Team India Asia Cup 2023  
क्रीडा

Team India Asia Cup 2023 : वर्ल्डकपपूर्वी आशिया कप जिंकल्याचा टीम इंडियाला काय झाला फायदा?, जाणून घ्या थोडक्यात

Kiran Mahanavar

Team India Asia Cup 2023 : आशिया कप 2023 मध्ये भारतीय संघाने विजेतेपदासह उत्कृष्ट कामगिरी केली आहे.अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाने प्रथम श्रीलंकेला 50 धावांवर रोखले. यानंतर 10 गडी राखून विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत भारतीय संघाने नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे. मात्र, संघाला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला.

आशिया कपनंतर भारतीय संघाला एकदिवसीय वर्ल्डकप घरच्या मैदानावर खेळायचा आहे. अशा स्थितीत वर्ल्डकपपूर्वी आशिया कप जिंकल्याचा टीम इंडियाला काय फायदा झाला. हे थोडक्यात जाणून घ्या...

नंबर-4 ची डोकेदुखी दूर...

दुखापतीनंतर पुनरागमन करणारा यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुलची थेट आशिया कपसाठी निवड करण्यात आली. त्यावेळी चाहत्यांनी राहुल असा धमाका करेल अशी अपेक्षाही केली नव्हती. राहुलने या स्पर्धेतील पहिला सामना सुपर-4 मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळला, ज्यामध्ये त्याने 111 धावांची नाबाद खेळी खेळली.

हा संघासाठी सर्वात मोठा फायदा मानला जाऊ शकतो, कारण राहुलने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ही खेळी खेळली. अशा परिस्थितीत त्याने भारतीय संघासाठी मधल्या फळीतील नंबर-4 ची डोकेदुखीही दूर केली आहे.

सलामीची जोडी जोमात...

आशिया कप 2023 मध्ये भारतीय संघाच्या सलामीनेही खळबळ उडाली आहे. शुभमन गिल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी प्रत्येक सामन्यात चांगली सुरुवात केली आहे. गिलने या स्पर्धेतील 6 सामन्यात सर्वाधिक 302 धावा केल्या. यावेळी त्याने बांगलादेशविरुद्ध 121 धावांची शतकी खेळीही खेळली. तर रोहितने 6 सामन्यांच्या 5 डावात 194 धावा केल्या. आता ही सलामीची जोडी चांगलीच जोमात आहे.

बुमराहने वेगवान गोलंदाजीत आणली धार

केएल राहुलप्रमाणेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनेही दुखापतीनंतर पुनरागमन केले आहे. मात्र, आशिया कपपूर्वी त्याने कर्णधार म्हणून आयर्लंड दौऱ्यावर टी-20 मालिका खेळली होती. बुमराहने या मोसमात 4 सामन्यांच्या 3 डावात 4 बळी घेतले. बुमराहने अंतिम फेरीत श्रीलंकेला पहिला आणि सर्वात मोठा धक्का दिला होता.

मोहम्मद सिराजचा जबरदस्त फॉर्म विरोधी संघांची डोकेदुखी...

वर्ल्ड कपपूर्वी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आशिया कपमध्ये आपली ताकद दाखवून जबरदस्त फॉर्म साधला आहे. फायनलमध्ये सिराजच्या गोलंदाजीने असा कहर केला की, श्रीलंकेचा डाव ५० धावांवर आटोपला. सिराजने अंतिम फेरीत 7 षटके टाकली, ज्यात त्याने 21 धावांत 6 मोठे बळी घेतले. अशाप्रकारे सिराजने या स्पर्धेत 5 सामन्यांच्या 4 डावात एकूण 10 बळी घेतले. वर्ल्डकपपूर्वी सिराजचा हा फॉर्म विरोधी संघांची डोकेदुखी वाढवू शकतो.

पांड्याची अष्टपैलू कामगिरी शानदार अन...

यावेळी आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाला वेगवान गोलंदाज हार्दिक पांड्याच्या रूपाने आणखी एक मोठा फायदा मिळाला आहे. पांड्याने या स्पर्धेत चेंडू आणि बॅट दोन्हीने खळबळ उडवून दिली आहे. पांड्याने 5 सामन्यांच्या 2 डावात फलंदाजी केली, ज्यात त्याने 46 च्या उत्कृष्ट सरासरीने 92 धावा केल्या. त्यावेळी त्याने कठीण काळात पाकिस्तानविरुद्ध 87 धावांची महत्त्वपूर्ण खेळीही खेळली.

पांड्याने गोलंदाजीतही ताकद दाखवली आहे. त्याने 5 सामन्यांच्या 4 डावात 6 विकेट घेतल्या. या कालावधीत त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 3 धावांत 3 विकेट्स घेणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Track मेन्टेनन्स मशीनची समोरासमोर धडक; 5 कर्मचारी जखमी, देखभालीचं काम सुरू असताना घटना

IND W vs PAK W: ०.४४ सेकंद! Richa Ghosh ची भारी रिअ‍ॅक्शन, अविश्वसनीय झेल घेऊन पाकिस्तानला दाखवला इंगा

Bigg Boss Marathi 5 grand finale LIVE Updates - हे स्पर्धक ठरले 'बिग बॉस मराठी ५' चे टॉप ३? सोशल मीडियावर ट्वीट व्हायरल

Video : शाळेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी गायलं 'अयि गिरि नन्दिनी'; नेटकरी झाले मंत्रमुग्ध, येथे पाहा Viral Video

Latest Maharashtra News Updates: पियुष गोयल यांच्या हस्ते मालाडमधील मनपा शाळेचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT