प्रत्येक ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेचे वेध लागल्यावर क्रीडा रसिक भारतीय हॉकीचे सुवर्णयुग परतणार अशी स्वप्ने बघत, पण आठ सुवर्णपदके जिंकलेल्या भारतीय हॉकी संघास मॉस्कोतील सुवर्णपदकानंतर आठ स्पर्धांत एकही पदक जिंकता आले नाही. आता हा दुष्काळ संपला तो टोकियोत. त्यादरम्यान काय घडले... त्याचाच हा वेगवान प्रवास
जुलै १९८० : स्पेनला ४-३ असे हरवून मॉस्को ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक
जानेवारी १९८२ : भारतात प्रथमच विश्वकरंडक हॉकी स्पर्धा, मुंबईतील या स्पर्धेत भारत साखळीत बाद
डिसेंबर १९८२ : दिल्लीतील आशियाई क्रीडा स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात १-७ पराभव. मीररंजन नेगी यांच्यावर टीका
एप्रिल १९९६ : सलग चौथ्या ऑलिंपिक स्पर्धेत भारत साखळीत बाद. एवढेच नव्हे, तर आठव्या क्रमांकावर. ऑलिंपिक इतिहासातील सर्वांत खराब कामगिरी. त्याच वर्षी मद्रासमधील चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत जर्मनीविरुद्ध ०-५ हार
डिसेंबर १९९८ : भारताने ३२ वर्षांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक जिंकले. दक्षिण कोरियाला शूटआउटवर ४-२ हरविताना आशिष बल्लाळने दोन स्ट्रोक रोखले. विजेत्या संघातील सहा जणांनी आगामी स्पर्धासाठी विश्रांती.
सप्टेंबर २००० : ऑलिंपिक स्पर्धेतील पोलंडविरुद्ध अखेरच्या साखळी सामन्यात अखेरच्या सेकंदास गोल गोल स्वीकारला. भारत स्पर्धेबाहेर
ऑक्टोबर २००१ : भारताने अर्जेंटिनास ६-१ हरवून विश्वकरंडक कुमार स्पर्धा जिंकली. नव्या हॉकी स्टारचा उदय
फेब्रुवारी २००५ :भारतीय हॉकी महासंघाकडून प्रीमियर हॉकी लीगची घोषणा
डिसेंबर २००६ : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत प्रथमच साखळीत गारद
मार्च २००८ : ऑलिंपिक पात्रता स्पर्धेतील प्राथमिक साखळीत भारताचा ब्रिटनविरुद्ध २-३ हार. पात्रता ठरविणाऱ्या लढतीतही ०-२ पराजित. प्रथमच भारताची ऑलिंपिकसाठी अपात्रता
ऑक्टोबर २०१० : नवी दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ०-८ हार
जुलै २०११ : भारतीय हॉकी महासंघ आणि हॉकी इंडियातील वाद विकोपास. प्रतिस्पर्ध्यांची समांतर लीगची घोषणा
ऑगस्ट २०१२ : लंडन ऑलिंपिक स्पर्धेत सर्व साखळी सामन्यात भारताची हार, ११ व्या क्रमांकासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची लढतही गमावली
ऑक्टोबर २०१४ : आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक, ऑलिंपिकला पात्रता
डिसेंबर २०१४ : जागतिक हॉकी लीगमध्ये ब्राँझपदक
जून २०१६ : भारत प्रथमच चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध शूटआउटवर हार
ऑगस्ट २०१६ : भारताने १९८० नंतर प्रथमच ऑलिंपिक स्पर्धते बाद फेरी गाठली. बेल्जियमने हरविले, भारतास साखळीत हरविलेले अर्जेंटिना विजेते
डिसेंबर २०१६ : बेल्जियमला हरवून भारत विश्वकरंडक कुमार हॉकीत विजेता
२०१८ : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्यात अपयश, आशियाई क्रीडा स्पर्धेत ब्राँझपदक. विश्वकरंडक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पराजित
नोव्हेंबर २०१९ : रशियास पराजित करून भारताची ऑलिंपिक पात्रता
मार्च २०२० : जागतिक हॉकी लीगमध्ये नेदरलँड्स, बेल्जियम तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय
ऑगस्ट २०२१ : ऑलिंपिक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दारुण पराभवानंतर यशोमालिका. पण बेल्जियमविरुद्ध २-५ हार. दोन दिवसांनी जर्मनीला हरवून ऑलिंपिक पदकांचा दुष्काळ संपविला
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.