विराट कोहली 
क्रीडा

न्यूझीलंडच्या दिग्गजाकडून आक्रमक विराटचं कौतुक

नामदेव कुंभार

IND vs NZ, WTC Final 2021 : भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान 18 जून ते 22 जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा (WTC Final )अंतिम सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचे दिग्गद माजी खेळाडू रिचर्ड हेडली (Richard Hadlee) यांनी भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या आक्रमक स्वभावाचं कौतुक केलं आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) आक्रमकपणामुळे भारतीय संघ आज सर्वोच्च स्थानी आहे. विराट कोहली जिंकण्यासाठी आपलं सर्वस्वी झोकून देतो. विराट कोहलीला खेळताना पाहायला मज्जा येते, असं वक्तव्य रिचर्ड हेडली (Richard Hadlee) यांनी केलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाला त्यांनी मुलाखत दिली आहे. यामध्ये न्यूझीलंड आणि भारत यांच्यादरम्यान होणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेवर आपलं मत व्यक्त केलं आहे. (WTC Final : Aggressive Kohli is responsible for India being one of the best teams : Hadlee)

न्यूझीलंडचा संघ शांत स्वभावानं खेळण्यासाठी ओळखला जातो. त्यांचा कर्णधार केन विल्यमसनला जगातील आघाडीच्या फलंदाज म्हणून ओळखलं जातं. विल्यमसनही शांत स्वभावामुळे जगभरात ओळकला जातो. दुसरीकडे भारतीय कर्णधार विराट कोहली त्याच्या आक्रमक स्वभावामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. विराट कोहली आपल्या भावना अतिशय खुलून मैदानावर जाहीर करतो. फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण... विराट कोहली नेहमीच विरोधी संघावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. विल्यमसन आणि विराट कोहली, या परस्परविरोधी स्वभावाच्या कर्णधाराबाबत प्रत्येकाची वेगवेगळी मतं आहेत. न्यूझीलंडचा दिग्गज माजी खेळाडू रिचर्ड हेडली यांच्यानुसार, सर्वोच्च लेव्हलवर क्रिकेट खेळणाऱ्यांमध्ये आक्रमकपणा येतोच.

एखाद्या क्रीडा प्रकारात सर्वोच्च स्थारावर गेल्यानंतर त्या खेळाडूमध्ये आक्रमकपणा येतोच. सामना जिंकण्यासाठी आणि प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करण्यासाठी आक्रमकपणा महत्वाची भूमिका बजावतो. पण आपण कोणत्याही नियमांचं उल्लंघन करत नाही ना? याचं भान खेळाडूनं नेहमी ठेवायला हवं. आपल्या भावना सर्वांसमोर व्यक्त करत खेळातात, असे खेळाडू सर्वांनाच आवडतात. असे खेळाडू प्रतिस्पर्धी संघाची लय बिघडवतात. विराट कोहलीमधील आक्रमकता भारतीय संघाच्या पथ्यात आहे. कोहली आज, कोट्यवधी क्रीडा प्रेमींचा आवडता खेळाडू आहे. अनेकांसमोर आदर्श म्हणून विराटचं उभा आहे. विराट कोहली जिंकण्यासाठी मैदानात उतरलेला असतो. त्याच्या आक्रमक स्वभावातून ते दिसूनही येतं.

भारत नंबर 1 तर न्यूझीलंड 2 -

आयसीसीच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत भारत पहिल्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर विराजमन आहे. 18 जून ते 22 जून रोजी दोघांमध्ये सामना होणार आहे. विराट कोहली आणि केन विल्यमसन यांच्या रुपानं जगातील दोन सर्वोत्कृष्ट फलंदाज समोरासमोर आले आहेत. हेडली यांच्यामते, इंग्लंडमधील थंड परिस्थिती न्यूझीलंडच्या बाजूनं आहेत. पण जो संघ इंग्लंडमधील परिस्थितीसोबत लवकर जुळवून घेऊन तो संघ चषकावर नाव कोरेल.

WTC Final फायनलबद्दल रिचर्ड हेडली काय म्हणाले-

सर्वोत्तम तयारी आणि इंग्लंडमधील परिस्थितीसोबत जुळवून घेणारा संघ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेवर नाव कोरेल. इंग्लंडमध्ये हवामान सर्वात मोठी भूमिका बजावू शकते. येथील वातारण थंड असून ते न्यूझीलंडच्या बाजूनं आहे. स्विंग करणाऱ्या गोलंदाजाला येथील वातावरणात जास्त यश मिळेल. न्यूझीलंडमध्ये स्विंग गोलंदाजांचा भरणार आहे. साउथी, बोल्ट आणि जेमीसन या गोलंदाजाकडे स्विंग करण्याची क्षमता आहे. दोन्ही संघामध्ये एकापेक्षा एक उत्कृष्ट फंलदाज आणि गोलंदाजांचा भरणा आहे, त्यामुळे सामना पाहण्यासारखा होईल. सध्या विजेत्या संघाबाबत भाकीत करणं कठीण आहे. मागील दोन्ही आयसीसी चषकात न्यूझीलंड संघ फायनलमध्ये पराभूत झालाय. दोन्ही संघ दबावाशिवाय क्रिकेटचा आनंद घेतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chetan Tupe won Hadapsar Assembly Election 2024: हडपसरमधील परंपरा मोडत चेतन तुपे यांचा विजय; प्रशांत जगताप यांचा पराभव

UP By Election: उत्तरप्रदेशात सुद्धा भगवे यश! पोटनिवडणुकीत योगींनी लोकसभेचे अपयश धुवून काढले, जाणून घ्या करणे

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: वांद्रे पूर्वमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी

Nanded Lok Sabha By Election Result 2024 : पोटनिवडणुकीतही काँग्रेसला मोठा झटका; गमावलेली नांदेडची जागा भाजपनं जिंकली

BJP Pravin Datke Won Nagpur Central Election : नागपूर मध्यचा गड भाजपने राखला, भाजपचे प्रवीण दटके 11516 मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT