Gaming Industry Sakal
क्रीडा

Gaming Industry: गेमिंग फक्त टाईमपास नव्हे, तर पैसे कमावण्याचंही साधन; महाराष्ट्रातल्या प्रमुख गेमर्सची कमाई किती?

काऊंटर स्ट्राईक, वॅलोरंट असे अनेक गेम्स खेळत हे गेमर्सआपलं करिअर घडवतात.

वैष्णवी कारंजकर

भारतामध्ये सध्या गेमिंग क्षेत्र वेगाने वाढत आहे. देशभरातून अनेक असे कन्टेन्ट क्रिएटर्स आणि प्रो गेमर्स या गेमिंगच्या माध्यमातून आपली नवी ओळख बनवत आहेत. गेमिंग आणि ई- स्पोर्ट्सच्या क्षेत्रातले बहुतांश प्रभावशाली व्यक्ती हे महाराष्ट्रातले आहेत आणि त्यांनी देशात आणि जगभरात या क्षेत्रामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. काऊंटर स्ट्राईक, वॅलोरंट असे अनेक गेम्स खेळून हे गेमर्स त्यात आपलं करिअरसुद्धा बनवतात.

टाईमपास म्हणून खेळल्या जाणाऱ्या या गेम्समधून ज्यांनी आपलं करिअरच घडवलं आहे. त्या व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्रातले सर्वात मोठे गेमर्स

महाराष्ट्रामधले पाच मोठे ई- स्पोर्ट्स प्लेअर आणि कन्टेन्ट क्रिएटर्सबद्दल आपण जाणून घेऊया. यामध्ये दिलेली माहिती आणि आकडेवारी ही लिक्विपीडिया आणि सोशलब्लेड या संकेतस्थळावरुन घेतलेली आहे.

ई-स्पोर्ट्समधून किती कमाई होते, त्याची आकडेवारी, गणित कसं असतं, हे या संकेतस्थळांवर सांगण्यात आलं आहे.

तसंच जी माहिती सार्वजनिक आहे, अशा माहितीच्या आधारे हा लेख प्रकाशित करण्यात येत आहे. यामध्ये एएफके गेमिंग या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीचाही समावेश आहे.

  • घातक गेमिंग

    खरं नाव - अभिजीत हरिश्चंद्र अंधारे

    सबस्क्राईबर्स (यूट्यूब) - ५,३२,०००

    घातक हा एक ई-स्पोर्ट्स प्लेअर आहे, कन्टेन्ट क्रिएटर आहे तसंच टीम ओआरबीचा संस्थापकही आहे.

    तो पूर्णवेळ ई-स्पोर्ट्स मॅनेजर असून गॉडलाईक ई-स्पोर्ट्सचा प्रशिक्षकही आहे. मूळचा पुण्याचा असलेला घातक याने गेमिंग आणि फोटोग्राफीमध्ये आपलं करिअर केलं आहे. PUBG या गेममुळे त्याने पूर्णवेळ गेमिंगच्या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.

    त्याने CS:GO, DOTA, Age of Conquerors असे गेम्स खेळले आहेत. पण तरीही तो PUBG आणि BGMI यासाठीच प्रसिद्ध आहे.

    कमाई किती?

    घातकने ई-स्पोर्ट्सच्या माध्यमातून आत्तापर्यंत साधारण ५१ हजार डॉलर्स इतकी कमाई केली आहे.

    सोशल ब्लेडने दिलेल्या माहितीनुसार, घातक आपल्या युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून दरवर्षी ११६ डॉलर्स ते १,९०० डॉलर्स इतकी कमाई करतो.

  • श्रीमान लिजंड

    खरं नाव - सिद्धांत प्रवीण जोशी

    सबस्क्राईबर्स (यूट्यूब) - २.५ मिलियन

    श्रीमान लिजंडने आपल्या मराठी कॉमेंट्रीमुळे महाराष्ट्रामध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. प्रादेशिक भाषांमध्ये गेमिंगचे व्हिडीओ बनवणाऱ्या पहिल्या काही युट्यूबर्समध्ये त्याचा समावेश होतो.

    त्याचे व्हिडीओ मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये असतात आणि तो अगदी दररोज लाईव्ह व्हिडीओ करत असतो.

    तो सुरुवातीला PUBG Mobile ही गेम खेळत असे. पण त्यानंतर हळूहळू त्याने आपल्या कन्टेन्टमध्ये वैविध्य आणलं आणि Grand Theft Auto सारख्या गेम्सही खेळायला सुरुवात केली.

    कमाई किती?

    सोशल ब्लेडने दिलेल्या माहितीनुसार, श्रीमान लिजंड आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून साधारण ४,७०० डॉलर्स ते ७५,७०० डॉलर्सची कमाई करतो.

    तो सध्या इंटेल, आरओजी सारख्या मोठ्या ब्रँड्ससोबत काम करत आहे. त्यामुळे त्याच्या कमाईचा आकडा यापेक्षाही अधिक असू शकतो. या कमाईबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही.

  • डायनॅमो गेमिंग

    खरं नाव - आदित्य सावंत

    सबस्क्राईबर्स (यूट्यूब) - १० मिलियन

    आदित्यने आपल्या कन्टेन्ट क्रिएशनच्या प्रवासाची सुरुवात २०१० मध्ये केली. पण त्याने पूर्णपणे गेमिंग क्षेत्रात काम करण्याची सुरुवात २०१७ पासून केली.

    तो फक्त एक यशस्वी गेमिंगविषयक कन्टेन्ट क्रिएटरच नसून त्याचं एक व्लॉगिंगचं युट्यूब चॅनेलही आहे.

    तसंच आदित्य हा इन्स्टाग्रामवर दोन मिलियनहून अधिक फॉलोअर्स असलेल्या भारतीय सेलिब्रिटींपैकी एक आहे. तो देशातला एक यशस्वी कन्टेन्ट क्रिएटरही आहे.

    कमाई किती?

    सोशल ब्लेडने दिलेल्या माहितीनुसार, डायनॅमो गेमिंग वर्षाला साधारणपणे २६,७०० ते ४,२६,५०० डॉलर्स कमावतो.

    पण यामध्ये पेड प्रमोशन आणि स्पॉन्सरशिपचा समावेश नाही.

  • क्रॉन्टन गेमिंग

    खरं नाव - चेतन संजय चांदगुडे

    सबस्क्राईबर्स (यूट्यूब) - २.०५ मिलियन

    चेतन संजय चांदगुडे हा एक व्यावसायिक ई- स्पोर्ट्स प्लेअर आहे.

    तो PUBG mobile, BGMI हे गेम्स खेळतो, तसंच तो एक सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सरही आहे.

    मूळचा पुण्याचा असलेला चेतन भारतातल्या प्रसिद्ध कन्टेन्ट क्रिएटर्सपैकी एक आहे. त्याने आता युट्यूबला व्हिडीओ पोस्ट करणं बंद केलं आहे, पण तो काही वेळा युट्यूबवरुन लाईव्ह स्ट्रिमिंग करत असतो.

    कमाई किती?

    क्रॉन्टन गेमिंग सक्रिय नसल्याने त्याची स्ट्रिमिंग आणि कन्टेन्ट क्रिएशनमधून होणारी कमाई अद्याप माहिती नाही.

    तो सध्या गॉडलाईक ई-स्पोर्ट्सच्या कामामध्ये गुंतलेला आहे. त्याने BGMI टूर्नामेंट्समधून आत्तापर्यंत १,२०,००० डॉलर्सहून अधिक कमाई केली आहे.

एक्लकॅली

खरं नाव - करण म्हसवडकर

सबस्क्राईबर्स (यूट्यूब) - ४६,६००

एक्सकॅली हा एक भारतीय प्लेअर आहे, जो टीम इन्वीक्टस, एन्टीटी गेमिंग, वेलोसिटी गेमिंग आणि इतरही अनेक टीम्ससाठी खेळला आहे. त्याने CS - GO, वॅलोरन्ट अशा दोन्ही गेम्समध्ये भाग घेतला होता.

तो भारतातल्या नावाजलेल्या प्लेअर्सपैकी एक आहे. त्याने गेमिंगच्या क्षेत्रामध्ये भारताचं आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व केलं आहे.

कमाई किती?

सोशल ब्लेडने दिलेल्या माहितीनुसार, एक्सकॅलीला युट्यूबच्या माध्यमातून दरवर्षी २२६ डॉलर्स मिळतात. त्याने ई-स्पोर्ट्स करिअरमधून ३७,५०० डॉलर्स कमावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Manifesto: विषय बदलले नाहीत, प्रश्न तेच.. आता आम्ही करू; असं म्हणत राज ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध, काय आहे खास?

IND vs AUS: ऋषभ पंतच्या बॉलिंगवर जसप्रीत बुमराहची फटकेबाजी! पाहा हा BCCI ने पोस्ट केलेला स्पेशल Video

१० पैकी १०! Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने डावात दहा बळी टिपले, Ranji Trophy त ३९ वर्षानंतर असे घडले

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

SCROLL FOR NEXT