Who Is Ex-cricketer Mrinank Singh detained for duping luxury hotels and Rishabh Pant marathi news  
क्रीडा

Who is Mrinank Singh : सुकेशपेक्षाही मोठ्या घोटाळेबाज IPL प्लेयरला अटक, कोण आहे ऋषभ पंतला गंडा घालणारा महाठक

Kiran Mahanavar

Who is Mrinank Singh News : सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरण सर्वांनाच माहित आहे, जो आता सध्या दिल्लीच्या मंडोली कारागृहात आहे. तसेच एक सेम नवीन प्रकरण समोर आले आहे. हरियाणाकडून अंडर-19 क्रिकेट खेळलेला क्रिकेटपटू मृणांक सिंग याला नवी दिल्लीच्या चाणक्यपुरी पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे. ज्याने पंचतारांकित हॉटेल्स, लोक आणि क्रिकेटपटू ऋषभ पंत यांची लाखो आणि कोटींची फसवणूक केली आहे.

आरोपी मृणांक सिंगने वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी असल्याचे दाखवून देशभरातील अनेक लक्झरी हॉटेल मालक/व्यवस्थापकांची फसवणूक केली. फसवणूक झालेल्यांमध्ये ऋषभ पंतच्या नावाचाही समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की तो आयपीएल फ्रँचायझीचा खेळाडू आहे आणि महिलांना फसवण्यासाठी त्याने लक्झरी जीवनशैलीचा वापर केला.(Cricket News in Marathi)

पंतची कशी झाली फसवणूक?

एवढेच नाही तर, त्याने भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतचीही फसवणूक केली आहे. त्याने 2020-2021 मध्ये पंतला 1.63 कोटी रुपयांचा गंडा घातला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृणांकने पंतला स्वस्तात लग्झरी घड्याळे मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते.

त्यावेळी ऋषभ पंतच्या मॅनेजरनेही तक्रार दाखल केली होती. पंतची फसवणूक करण्यापूर्वी, मृणांकने स्वत: ला लक्झरी घड्याळे, पिशव्या आणि दागिन्यांचा बिझनेस मॅन म्हणून वर्णन केले होते, जो त्याच्या लक्झरी वस्तू स्वस्त दरात विकतो. ऋषभचा विश्वास जिंकण्यासाठी त्याने अनेक खोटे बोलले आहेत. आणि यासोबत त्याने या वस्तू इतर क्रिकेटपटूंनाही सवलतीच्या दरात विकल्याचं सांगितलं आहे.(Cricket News in Marathi)

मृणांक सिंग स्वत:ला एका आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स ब्रँडचे अॅम्बेसेडर म्हणून सर्वांना दाखवले आणि खेळाशी संबंधित शोरूमची फसवणूक केली आहे. अनेक भारतीय क्रिकेटपटूंशी आपले जवळचे संबंध असल्याचा दावाही आरोपी सिंगने केला आहे.

22 ऑगस्ट 2022 रोजी मध्य दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलच्या सुरक्षा संचालकाकडून चाणक्यपुरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. ज्यामध्ये आरोपी सिंगने स्वतःला क्रिकेटर म्हणून वर्णन केले आणि 22 ते 29 जुलै 2022 या कालावधीत हॉटेलमध्ये राहिल्या. आणि 5,53,362 रुपयांचे बिल न देता तो हॉटेलमधून पळून गेला.

एका हॉटेलच्या अधिकाऱ्याने त्याला बिल भरण्यास सांगितले तेव्हा आरोपी सिंगने सांगितले की, त्याचे बिल त्याची प्रायोजक कंपनी देईल. यानंतर हॉटेलने त्याला बँक डिटेल्स दिले पण आरोपीने हॉटेलमध्ये पाठवलेल्या 2 लाख रुपयांच्या ऑनलाइन व्यवहाराचा UTR क्रमांक बनावट निघाला. तपासादरम्यान त्याच्या पत्त्यावर नोटीस पाठवण्यात आली होती मात्र तो त्या पत्त्यावर सापडला नाही. (Cricket News in Marathi)

कोठडीत असतानाही पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न

मृणाक सिंगला सोमवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावरून हाँगकाँगला जाण्याच्या प्रयत्नात असताना अटक करण्यात आली. पोलिस कोठडीदरम्यान सिंगला वरिष्ठ आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून तपास अधिकाऱ्यांवर प्रभाव टाकण्याचाही प्रयत्न केला. चौकशीदरम्यान, त्याने आयपीएल संघाचा क्रिकेटपटू असल्याचे भासवून अनेक लक्झरी रिसॉर्ट्स/हॉटेलमधून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या मोबाईलच्या तपासात अनेक लोक त्याच्या फसवणुकीला बळी पडल्याचे समोर आले आहे. सिंगला दोन दिवसांची पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे. मुंबई (महाराष्ट्र), हरियाणा आणि पंजाबमध्ये फसवणुकीच्या तीन गुन्ह्यांमध्येही त्याचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT