Who is Sarabjot Singh  sakal
क्रीडा

Who is Sarabjot Singh : फुटबॉलपटूचं स्वप्न बघणारा मुलगा नेमबाज कसा झाला; भारताला ऑलिंपिक पदक मिळवून सरबज्योत सिंगचा प्रवास

Paris Olympics 2024 News : पॅरिस ऑलिम्पिकच्या शूटिंग रेंजमध्ये भारतीय नेमबाजांची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळाली.

Kiran Mahanavar

Manu Bhaker-Sarabjot Singh pair wins 2nd bronze for India at Paris Olympics 2024:

नवी दिल्ली: पॅरिस ऑलिम्पिकच्या शूटिंग रेंजमध्ये भारतीय नेमबाजांची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळाली. यावेळी मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र स्पर्धेत देशासाठी कांस्यपदक जिंकले. या दोघांच्या जोडीने दक्षिण कोरियाच्या नेमबाजांचा पराभव केला.

यासह, ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी मनू भाकर ही देशातील पहिली महिला ठरली. मात्र, आता मनू भाकरसोबतचा त्याचा सहकारी सरबज्योत सिंगबद्दलही जाणून घेणे महत्त्वाचे आहे. सरबज्योत सिंगसाठीही हा विजय खूप खास आहे, कारण हे त्याचे पहिले ऑलिम्पिक पदक आहे.

उन्हाळी शिबीरात गेला आणि देशाला नेमबाज मिळाला

सरबज्योत सिंगचा जन्म अंबाला येथील बरारा येथे झाला. त्याचे वडील जतिंदर सिंग हे शेतकरी आहेत आणि आई हरदीप कौर गृहिणी आहेत. सरबज्योत सिंगला खरंतर फुटबॉलपटू व्हायचं होतं. पण उन्हाळी शिबीरात त्याचा पहिल्यांदा नेमबाजीशी संपर्क आला. हातात पिस्तूल घेऊन नेमबाजीचा सराव करणारी मुलं सरबज्योतने बघितली आणि त्यानेही नेमबाजीकडे वळण्याचा निर्णय घेतला.

सरबज्योत सिंगचा जन्म एका छोट्या गावात झालाय. आर्थिक परिस्थितीही फार चांगली नव्हती. नेमबाजीसाठी येणारा खर्च कुटुंबाला परवडणारा नव्हता. पण सरबज्योतने कुटुंबियांना पटवून दिले आणि आईवडिलांनीही मुलाची इच्छा पूर्ण केली. आई-वडिलांनी त्याला प्रशिक्षणासाठी दिल्लीलाही पाठवले. सरबजोतने अंबाला कँटमधील एआर शूटिंग अकादमीमध्ये शूटिंगचे प्रशिक्षण घेतले आहे, त्याच्या प्रशिक्षकाचे नाव अभिषेक राणा आहे.

रोख पारितोषिकमधून वडिलांसाठी ट्रॅक्टर घेतला

सरबज्योत सिंगच्या वडिलांना मुलाने त्यांच्यासारखंच शेतकरी व्हावं असं वाटत होते. पण मुलाचा कल नेमबाजीकडे झुकतंय हे लक्षात आल्यानंतर आम्ही त्याचे स्वप्न पूर्ण करण्याची तयारी केली. त्याने नेमबाजी स्पर्धांमध्ये मिळालेल्या रोख रकमेतून शेतासाठी ट्रॅक्टर विकत घेतले होते, असे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने २०२३ मध्ये दिले होते.

सरबज्योत सिंगने यापूर्वी 2019 मध्ये ISSF ज्युनियर वर्ल्ड कप जिंकला होता. 2021 मध्ये त्याने जागतिक चॅम्पियनशिपमध्ये एकेरी आणि सांघिक स्पर्धांमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकले. 2023 मध्येही त्याने त्याच कामगिरीची पुनरावृत्ती केली आणि आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर या खेळाडूने पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले आणि पदार्पणातच कांस्यपदक जिंकले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Gramin: 'कल्याण ग्रामीण'मधून महायुतीचा उमेदवार रिंगणात कधी? शिंदे गटाची आळीमिळी गुपचिळी

Share Market Closing: शेअर बाजाराचे जोरदार 'कमबॅक'; सेन्सेक्स 600 अंकांनी वाढला, बँक निफ्टीमध्ये मोठी वाढ

मायरा वायकुळच्या भावाला पाहिलंत का? दिवाळीच्या मुहूर्तावर दाखवला चेहरा, नेटकरी म्हणतात- हा तर हुबेहूब...

Tata-Airbus: नागपूरच्या टाटा एअरबस प्रोजेक्टचे गुजरातला उद्घाटन? काँग्रेसचा मोठा आरोप; "महाराष्ट्राच्या जखमेवर मिठ..."

Bjp Candidates Third List: लातूरमध्ये देखमुख विरुद्ध चाकूरकर थेट लढाई, भाजपची तिसरी यादी जाहीर; काँग्रेस बंडखोरांना संधी

SCROLL FOR NEXT