Paris Olympics 2024 esakal
क्रीडा

Paris Olympics 2024 : बंदी उठताच पॅरिस ऑलिम्पिक आयोजक का वाटणार 3 लाख काँडोम्स?

अनिरुद्ध संकपाळ

Why Paris Olympics 2024 Organizer Will provide 300000 condoms : यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्येही आयोजकांकडून खेळाडूंना काँडोम्स देण्यात येणार आहे. पॅरिस हे प्रेमाचे शहर म्हणून ओळखलं जातं. नुकतेच सरकारने ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी लैंगिक संबंध ठेवण्यावरील बंदी उठवली होती. ऑलिम्पिक व्हिलेजचे संचालक लॉरेंट यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी पॅरिस गेम्स दरम्यान 14250 खेळाडूंना जवळपास 3 लाख काँडोम्स पुरवणार असल्याचे सांगितले.

ऑलिम्पिकने 2020 मध्ये आपली ही पॉलिसी बदलली. टोकिया ओलिम्पिक गेम्समध्ये देखील काँडोम वाटण्यात आले होते. त्यावेळी कोरोना महामारीमुळे खेळाडूंना लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यास मज्जाव केला होता. त्यावेळी दोन खेळाडूंमध्ये साडे सहा फूट अंतर ठेवण्याचे आदेश होते.

ऑलिम्पिक गेम्समध्ये काँडोम्सचे वाटप हे काही पहिल्यांदा होत नाहीये. 1988 च्या सेऊल ऑलिम्पिकमध्ये 8500 काँडोम्स वाटण्यात आले होते. त्यावेळी एचआयव्ही आणि एड्सविरूद्ध जनजागृती करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. तेव्हापासून स्पर्धेत काँडोम्स वाटण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 2000 च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये आयोजकांनी 70000 काँडोम्स वाटले होते.

मात्र तेही कमी पडल्याने अधिकचे 20 हजार काँडोम्स पुन्हा वाटण्यात आले. रिओ ऑलिम्पिकमध्ये पुरूष आणि महिला खेळाडूंना मिळून तब्बल 4 लाख 50 हजार काँडोम्स वाटले होते. लैंगिक संबंधांवर बंदी असल्याने देखील टोकिया ऑलिम्पिकमध्ये जवळापस दीड लाख काँडोम्स वाटले होते. मात्र राऊटरने दिलेल्या माहितीनुसार ते काँडोम्स वापरण्यात आले नाहीत.

स्काय न्यूजने दिलेल्या माहितीनुसार ऑलिम्पिक 2024 हे खेळाडूंना एकमेकांमध्ये मिसळण्यास प्रोत्साहन देणार आहे. ऑलिम्पिक व्हिलेजचे संचालक म्हणाले की, 'आम्ही खेळाडूंच्या समितीसोबत काम करत आहोत. आम्हाला अशा जागा तयार करायच्या आहेत जिथे खेळाडू उत्साही आणि सहज फिल करतील.'

व्हिलेजचे संचालक लॉरेंट पुढे म्हणाले की, आम्ही 350 मीटरपेक्षा जास्त लांबीचा जागतिक फूड बफेट लावणार आहोत. आम्हाला खात्री आहे की खेळाडू काही फ्रेंच पदार्थांचा नक्कीच आनंद घेतील. मात्र वैविध्य आणि खेळाडूंना उपयुक्त आहार देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT