Why Shreyas Iyer Out Of Team India BCCI Did Not Give The Reason Marathi News sakal
क्रीडा

Ind vs Eng : दुखापत की खराब फॉर्म..., श्रेयस अय्यर टीम इंडियातून का गेला बाहेर?

India Squad Announcement Updates : इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली....

Kiran Mahanavar

Shreyas Iyer Out Of Team India : इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर संपूर्ण मालिकेतून बाहेर आहेत. कोहली वैयक्तिक कारणांमुळे पहिले दोन सामने खेळू शकला नव्हता. आता या कारणांमुळे तो पुढील सामन्यांमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ही माहिती दिली. पण बोर्डाने अय्यर यांच्याबाबत काहीही सांगितले नाही.

हैदराबादमधील पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली. त्याचवेळी विशाखापट्टणममधील दुसरी कसोटी भारताने जिंकली. पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी अय्यर भारतीय संघाचा भाग होता, पण मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांमधून त्याला वगळण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, अय्यर पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. दुखापतीव्यतिरिक्त तो खराब फॉर्ममधून जात आहे. गेल्या 13 डावांमध्ये त्याने एकही अर्धशतक झळकावलेले नाही.

कोहलीच्या अनुपस्थितीत अय्यर चौथ्या क्रमांकावर आपली छाप सोडू शकला नाही. अय्यरला विशाखापट्टणममधील दोन डावांमध्ये केवळ 27 आणि 29 धावा करता आल्या. केवळ या सामन्यातच नाही तर मागील 13 डावांमध्ये तो अपयशी ठरला आहे. अय्यरने डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटचे अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर त्याने अनुक्रमे 29*, चार, 12, 0, 26, 31, 6, 0, 4*, 35, 13, 27 आणि 29 धावा केल्या.

श्रेयस अय्यरने सध्याच्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत चार डावांत 104 धावा केल्या आहेत. 14 सामन्यांच्या कसोटी कारकिर्दीत अय्यरने 36.86 च्या सरासरीने 811 धावा केल्या आहेत. या काळात त्याने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली. विशेष म्हणजे विशाखापट्टणममधील दुसऱ्या कसोटीनंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही अय्यरशी बराच वेळ बोलताना दिसला.

तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये सुरू होणार आहे. तर चौथी कसोटी 23 फेब्रुवारीपासून रांचीमध्ये खेळली जाणार आहे. या मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी 7 मार्चपासून धरमशाला येथे खेळली जाणार आहे.

मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT