Why Shubman Gill Not Performing Well In Test Cricket : टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि विराट कोहलीचा पुढील फलंदाजीचा उत्तराधिकारी प्रिन्स शुभमन गिल सध्या कसोटी क्रिकेटमध्ये 'आउट ऑफ फॉर्म' आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनल झाल्यापासून गिलने क्रिकेटच्या या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये एकही अर्धशतक झळकावलेले नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटी सामन्यातही गिलची बॅट शांत राहिली. सेंच्युरियन कसोटी सामन्यात गिलला केवळ 28 धावा करता आल्या होत्या.
महान फलंदाज सुनील गावसकर यांनी शुभमन गिलच्या खराब फॉर्मबाबत मोठे वक्तव्य केले आहे. गावसकर यांनी गिलच्या कसोटी क्रिकेटमधील खराब फॉर्मची कारणे सांगितली. स्टार स्पोर्ट्सवर सुनील गावसकर म्हणाले की, 'मला वाटते की तो कसोटी क्रिकेटमध्ये खूप आक्रमक खेळत आहे. टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटच्या तुलनेत कसोटी क्रिकेट थोडे वेगळे आहे. फरक बॉलचा आहे. लाल चेंडू हवेत आणि खेळपट्टीबाहेर, पांढऱ्या चेंडूपेक्षा थोडा जास्त हलतो. लाल चेंडूही थोडा अधिक उसळी देतो. त्यांनी या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात.
गावसकर पुढे म्हणाले, 'शुबमन गिलने आपल्या कारकिर्दीची सुरुवात चांगली केली. आणि आम्ही त्याच्या शॉट्सचे कौतुक केले. तो त्याच्या फॉर्ममध्ये परत येईल, अशी आशा आपण करू शकतो.
गिलचा कसोटी क्रिकेटमधील फॉर्म आणि त्याच्या अलीकडच्या खेळींवर नजर टाकली, तर तो संघर्ष करताना दिसत आहे. शुभमन गिलचे कसोटी क्रिकेटमधील शेवटचे शतक 9 मार्च 2023 रोजी अहमदाबाद येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकले होते.
त्यानंतर त्याने 13, 18, 6, 10, 29 नाबाद, 2 आणि 26 धावांची खेळी खेळली. गिलने आतापर्यंत 19 सामन्यांत 31.06 च्या सरासरीने 994 धावा केल्या आहेत आणि 2 शतके आणि 4 अर्धशतके आहेत.
गिलचा एकदिवसीय क्रिकेटमधील उत्कृष्ट विक्रम
शुभमन गिलच्या आकडेवारीवर नजर टाकली तर त्याची बॅट फक्त एकदिवसीय सामन्यांमध्येच चमकली आहे. गिलने आतापर्यंत 44 एकदिवसीय सामन्यांमध्ये 61.37 च्या सरासरीने आणि 103.46 च्या स्ट्राईक रेटने 2271 धावा केल्या आहेत. त्यात 6 शतकांचाही समावेश आहे. एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 मध्ये गिलची कामगिरी समाधानकारक होती, येथे त्याने 9 सामन्यांमध्ये 44.25 च्या सरासरीने आणि 106.94 च्या स्ट्राइक रेटने 354 धावा केल्या.
आतापर्यंत, गिलने 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये गिलने 26.00 च्या सरासरीने आणि 145.11 च्या स्ट्राइक रेटने 312 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एका शतकाचा समावेश आहे. म्हणजेच गिल कसोटीपाठोपाठ टी-20 मध्येही संघर्ष करताना दिसत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.