Why South Africa Will Wear Pink Jersey During 1st ODI : भारताविरुद्ध खेळल्या जाणार्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने एक मोठी घोषणा केली आहे.
भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ त्याच्या पारंपारिक हिरव्या जर्सीत नाही. तर गुलाबी जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे, असे बोर्डाने म्हटले आहे. यामागचे कारण काय, हेही बोर्डाने सांगितले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेला आजपासून म्हणजेच 17 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. जोहान्सबर्गच्या न्यू वँडर्स स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या सामन्यात यजमान संघ गुलाबी जर्सीमध्ये दिसणार आहे.
लोकांना ब्रेस्ट कॅन्सरबद्दल जागरूक करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू ही गुलाबी जर्सी घालणार आहे. या सामन्यातून जमा होणारा पैसा ब्रेस्ट कॅन्सर चॅरिटेबल ट्रस्टला जाईल.
तुम्हाला आठवत असेल किंवा नसेल पण एबी डिव्हिलियर्सने पिंक वनडे सामन्यातच विश्वविक्रम केला होता. डिव्हिलियर्सने गुलाबी जर्सीमध्येच वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात जलद शतक झळकावले. त्याने 2015 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 31 चेंडूत शतक पूर्ण केले होते.
त्या सामन्यात डिव्हिलियर्सने 44 चेंडूत 149 धावा केल्या होत्या. या खेळीच्या जोरावर यजमान संघाने 2 गडी गमावून 439 धावा केल्या, जी वनडेतील आतापर्यंतची पाचवी सर्वोच्च धावसंख्या आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.