Wi vs Ind 1st Test 
क्रीडा

Wi vs Ind: 145 किलोच्या पठ्ठ्याने सिक्सपॅक विराट कोहलीला केलं चीतपट! पाहा कशी घेतली विकेट

Kiran Mahanavar

Wi vs Ind 1st Test : वेस्ट इंडिजचा ऑफस्पिनर रहकीम कॉर्नवॉल हा कसोटी क्रिकेट खेळणारा सर्वात वजनदार खेळाडू आहे. 2019 मध्ये जेव्हा त्याने कसोटी पदार्पण केले तेव्हा त्याचे वजन 140 किलो होते. आता त्याचे वजन 145 किलो झाले असल्याचे सांगितले जात आहे.

क्रिकेटमध्ये तो सर्वात अनफिट खेळाडू आहे. यानंतरही कॉर्नवॉलने ते केले जे वेस्ट इंडिजचा कोणताही खेळाडू करू शकला नाही. त्याच्यामुळे परदेशात कसोटी शतक झळकावण्यासाठी विराट कोहलीची 1673 दिवसांची प्रतीक्षा लांबली.

डॉमिनिका कसोटीच्या दुसऱ्या दिवशी राहकीन कॉर्नवॉलला श्वास घेण्यात त्रास होत होता, यामुळे तो मैदानाबाहेर गेला. यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांना कॉर्नवॉलविरुद्ध धावा काढण्यात अडचणी येत होती.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी तो परतला. पहिल्या सत्रात गोलंदाजी करू शकला नाही. पण नंतर गोलंदाजीची संधी मिळताच कॉर्नवॉलने त्याच्या दुसऱ्याच षटकात विराट कोहलीची शिकार केली. त्याचा ऑफ-स्पिन चेंडू 9.2 अंश फिरला आणि विराटला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

राहकीन कॉर्नवॉलचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पडला. पडल्यानंतर तो खूप वेगाने वळला आणि लेग स्टंपच्या बाहेर जाऊ लागला. विराट कोहलीला आपली बॅट रोखता आली नाही आणि तो शॉर्ट खेळला आणि लेग स्लिपवर क्षेत्ररक्षण करताना अॅलिक अथानाझने चेंडू झेलला. आऊट झाल्यानंतर विराट कोहलीचा यावर विश्वासच बसत नव्हता. चेंडू इतका कसा फिरला हे त्याच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट झाले. विराटने 182 चेंडूत 76 धावांची खेळी खेळली.

भारतीय संघाने हा सामना एक डाव आणि 141 धावांनी जिंकला. वेस्ट इंडिजचा पहिला डाव 150 आणि दुसरा डाव 130 धावांवर आटोपला. भारतीय संघाने पहिला डाव 421/5 धावांवर घोषित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT