IND vs WI Gaiwad Debut Kohli or Rahane Dropped 
क्रीडा

Wi vs Ind: ऋतुराजची एंट्री, कोहली किंवा रहाणेला डच्चू? दूसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित घेणार मोठा निर्णय

Kiran Mahanavar

Wi vs Ind 2nd Test Playing 11 : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिज दौऱ्याची धमाकेदार सुरुवात केली. डॉमिनिका येथे खेळल्या गेलेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 141 धावांनी पराभव केला. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरी कसोटी आता पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे 20 जुलैपासून खेळल्या जाणार आहे. यजमानांविरुद्ध क्लीन स्वीप करण्याच्या इराद्याने टीम इंडिया त्रिनिदादमध्ये मैदानात उतरणार आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग-11मध्ये बदल पाहायला मिळू शकतात. सहसा मालिकेतील पहिल्या सामन्यातील विजयानंतर फारशी छेडछाड होत नाही, परंतु त्रिनिदादमध्ये भारताचा प्लेइंग-11 बदलू शकतो.

डोमिनिका कसोटी जिंकल्यानंतर खुद्द कर्णधार रोहित शर्माने याचे संकेत दिले होते. रोहित म्हणाला होता की, संघात असे खेळाडू आहेत ज्यांनी कसोटी क्रिकेट खेळले नाही, त्यामुळे आता त्यांना मैदानात उतरवायचे आहे.

आता अशा परिस्थितीत संघात काय बदल होऊ शकतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ऋतुराज गायकवाडला दुसऱ्या कसोटी सामन्यात माजी कर्णधार विराट कोहली किंवा उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.

कसोटी मालिकेनंतर भारत वेस्ट इंडिजविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेत कोहलीही संघाचा भाग असणार आहे. भारतीय संघ 2023 च्या विश्वचषक स्पर्धेची तयारीही एकदिवसीय मालिकेपासून सुरू करणार आहे. अशा परिस्थितीत 50 षटकांच्या मालिकेपूर्वी विराटला विश्रांती दिली जाऊ शकते.

विराट कोहली गेल्या वर्षीच्या बांगलादेश दौऱ्यापासून एकदिवसीय आणि कसोटी संघाचा भाग आहे. यादरम्यान तो आयपीएल 2023 मध्ये खेळतानाही दिसला होता. अशा स्थितीत त्याच्यावरील कामाचा ताण लक्षात घेऊन संघ व्यवस्थापन गायकवाड यांना आजमावू शकते. विराट कोहलीने पहिल्या सामन्यात 76 धावा केल्या होत्या.

मात्र, कोहलीच्या ऐवजी अजिंक्य रहाणेच्या जागी ऋतुराजला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते. डॉमिनिका कसोटीत रहाणे केवळ 3 धावा करून बाद झाला. कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही रहाणेऐवजी ऋतुराज गायकवाडला संधी देऊ शकतात.

26 वर्षीय उजव्या हाताचा फलंदाज ऋतुराज गायकवाडला प्रथमच भारतीय कसोटी संघाचा भाग बनवण्यात आले आहे. याआधी त्याने देशासाठी 1 वनडे आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत. आयपीएल 2023 दरम्यान ऋतुराज गायकवाडची बॅट जोरदार बोलली होती. चेन्नई सुपर किंग्जला पाचवे विजेतेपद मिळवून देण्यातही त्याचा मोठा वाटा होता. गायकवाडने 16 सामन्यात 42 च्या सरासरीने फलंदाजी करत 590 धावा केल्या.

बीसीसीआयने आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी टीम इंडियाचे कर्णधारपदही ऋतुराज गायकवाडकडे सोपवले आहे. गायकवाड महाराष्ट्रासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो, त्याच्या नावावर 28 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 1941 धावा आहेत. 5 दिवसांच्या क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 6 शतके आणि 9 अर्धशतके आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT