kuldeep yadav and ravindra jadeja 1st match wi vs ind sakal
क्रीडा

Wi vs Ind ODI: 44 चेंडू… 26 धावा….7 विकेट्स! रोहित शर्माची एक समस्या सुटली, वर्ल्डकप जिंकवणार हे डावखुरे?

Kiran Mahanavar

Wi vs Ind 1st ODI : टीम इंडियाने विश्वचषकाच्या तयारीला विजयाने सुरुवात केली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 5 विकेटने पराभव केला. भारताने विजयासाठी 115 धावांचे लक्ष्य 163 चेंडू राखून पूर्ण केले. कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या दोन गोलंदाजांनी भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या दोन गोलंदाजांच्या फिरकीपुढे वेस्ट इंडिजचे फलंदाज गारद झाले.

कुलदीप-जडेजा या जोडीने अवघ्या 44 चेंडूत केवळ 26 धावा देत वेस्ट इंडिजच्या 7 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला, आणि कॅरेबियन संघ 3 बाद 88 धावा वरून 114 धावांवर सर्वबाद झाला.

भारताच्या विजयामुळे रोहित शर्माच्या विश्वचषक स्पर्धेतील समस्या दूर होताना दिसत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ व्यवस्थापनासमोर प्रश्न होता की, भारत कोणत्या फिरकीपटूंसह विश्वचषकात खेळणार. अंदाजे दोन मनगट आणि दोन डावखुरे फिरकीपटू संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत होते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कुलदीप आणि रवींद्र जडेजा यांनी ज्या प्रकारची गोलंदाजी केली, ते पाहता फिरकी गोलंदाजांबाबतचे चित्र स्पष्ट होत आहे.

कुलदीप-जडेजाने घेतल्या 7 विकेट

कुलदीप यादवने फक्त 3 षटके टाकली. यामध्ये त्याने 15 डॉट बॉल टाकले आणि 6 धावांत 4 विकेट घेतल्या. त्याचवेळी रवींद्र जडेजाने 6 षटकांत 37 धावा देत 3 विकेट घेतल्या. कुलदीप आणि रवींद्र जडेजा यांनी मिळून 7 विकेट घेत एक खास विक्रमही आपल्या नावावर केला आहे. सात किंवा त्याहून अधिक विकेट घेणारी पहिली भारतीय डावखुरी फिरकी जोडी ठरली आहे.

कुलदीप यादवने भारताकडून घेतल्या सर्वाधिक विकेट

या वर्षी वनडेमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कुलदीप यादव आहे. त्याने 9 सामन्यात 17 च्या सरासरीने 19 विकेट घेतल्या आहेत. मोहम्मद सिराजच्याही तेवढ्याच विकेट्स आहेत. त्याचबरोबर रवींद्र जडेजाने 4 वनडेत 5 विकेट्स घेतल्या आहेत. यावर्षी युझवेंद्र चहलने केवळ 2 एकदिवसीय सामने खेळले असून त्याने 3 विकेट घेतल्या आहेत.

विश्वचषकादरम्यान मधल्या षटकांमध्ये कुलदीप टीम इंडियाचे सर्वात मोठे ट्रम्प कार्ड ठरू शकतो. परत आल्यापासून, तो विकेट घेण्यापेक्षा चेंडूच्या लाईनवर जास्त काम करत आहे. टीम इंडियाच्या विश्वचषकाच्या नियोजनात कुलदीप लेगस्पिनर चहलच्या वर आहे.

जर कुलदीप आणि जडेजा उरलेल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये असाच धमाका करू शकले तर त्यांची विश्वचषक स्पर्धेची तिकिटे निश्चित आहे. हे दोघेही भारतातील फिरकी गोलंदाजीला उपयुक्त खेळपट्ट्यांवर अप्रतिम कामगिरी दाखवू शकतात. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याचा ट्रेलर दाखवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT