क्रीडा

सुशील कुमारकडून पद्मश्री पुरस्कार परत घेणार?

नामदेव कुंभार

पैलवान सागर राणा हत्येप्रकरणात (Sagar Dhankar Murder Case) दिल्ली पोलिसांनी रविवारी दोनवेळचा ऑलिम्पिकवीर सुशील कुमारला (sushil kumar) अटक केली होती. आता हे प्रकरण दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे. क्रीडा जगतातील उत्कृष्ट कामगिरीमुळे भारत सरकारने त्याला पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात असणाऱ्या सुशीलकुमार याच्याकडून सरकार पद्मश्री पुरस्कार परत घेणार का? अशा चर्चेला आता उधान आलं आहे. पण, पद्मश्री पुरस्कार (padma award) रद्द करण्याचा असा कोणताही नियम स्पष्ट नाही. त्याचबरोबर याआधी कोणत्याही पद्म पुरस्कार विजेत्या व्यक्तीने इतका गंभीर गुन्हा केला नाही. त्यामुळे सरकारकडून पद्मश्री पुरस्कार परत घेण्याच्या निर्णायाबाबत सध्या संयम ठेवला जाण्याची शक्यता आहे. असा कोणताही नियम नसल्यामुळे गजाआड असणाऱ्या सुशीलकुमारकडून तातडीनं पुरस्कार परत घेतला जाणार नाही. (will sushil kumar lose his padma award government)

युवा कुस्तीपटू सागर धनखड यांची हत्याप्रकरणी सुशीलकुमारल पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुशीलकुमारवर हत्या, मारहाण आणि हत्येचा कट रचण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सुशीलकुमारने दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकले आहे. 2008 बिजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य तर 2012 लंडन ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते. कुस्तीमध्ये देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावणाऱ्या सुशील कुमार याला २०११ साली पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.

सुशीलकुमार याचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्याच्या प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्रालयाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असं गृहमंत्रालयाने स्पष्टिकरण दिलं आहे. माजी गृहसचिव एन गोपालास्वामी यांनी एनबीटीला दिलेल्या माहितीनुसार, सुशीलवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत गृह मंत्रालय पद्म पुरस्काराचा फेरआढावा घेऊ शकते. पण राष्ट्रपती सुशीलचा पुरस्कार रद्द करण्याआधी न्यायालयाच्या निकालाची वाट पाहतील. कोर्टामध्ये सुशीलकुमारवर आरोपपत्र दाखल झाल्यानंतर राष्ट्रपती पुरस्कार रद्द करू शकतात. जर सुशीलकुमारची निर्दोष मुक्तता झाली तर पुरस्कार रद्द करण्याचा निर्णय मागे घेतला जाऊ शकतो.

रेल्वेतील नोकरी जाणार

सुशील कुमार नोकरी करत असलेल्या उत्तर रेल्वेतून त्याला निलंबित केले जाण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांकडून आम्हाला सुशील कुमारच्या अटकेचा अहवाल मिळाला आहे. त्याला लवकरच रेल्वेतू निलंबित करण्यात येईल, असे उत्तर रेल्वेचे सीपीआरओ दीपक कुमार यांनी सांगितले.

सुशीलच्या प्रकरणामुळे कुस्ती कलंकित

खुनाच्या आरोपामुळे फरारी झालेल्या सुशील कुमारला झालेली अटक आणि एकूणच या प्रकरणामुळे देशाची कुस्तीची प्रतिमा कलंकित झाली, अशी निराशा भारतीय कुस्ती फेडरेशनचे सहसचिव विनोद तोमर यांनी व्यक्त केली. भारतीय कुस्तीला मोठा दर्जा मिळवून देण्यात सुशीलची आखाड्यातील मेहनत मोठी होती, यात शंकाच नाही. पण जे काही घडले आहे, त्यातील सत्य आपल्याला माहिती नाही. खेळाडू म्हणून फेडरेशनच्या भावना सुशीलच्या पाठीशी आहेत. न्यायालयात तो जोपयो दोषी जाहीर केले जात नाही तोपर्यंत भारतीय कुस्ती फेडरेशन त्याच्याव कोणतीही कारवाई करणार नाही, असे तोमर यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT