पुणे - बडोदा येथे झालेल्या वरिष्ठ महिला गटाच्या एकदिवसीय करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत उत्तराखंड संघाने महाराष्ट्राचा आठ धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. मधल्या फळीत तेजल हसबनीसने (१०५) झळकावलेली शतकी खेळी अपुरी ठरली.
या लढतीत उत्तराखंडने प्रथम फलंदाजी करताना सात बाद २०१ धावा केल्या त्यात महत्त्वाचा वाटा कांचन परिहार (६०) आणि पूनम राऊतने (५१) केलेल्या अर्धशतकाचा होता त्यांना कर्णधार एकता बिश्तने (२५) सुरेख साथ दिली. महाराष्ट्राकडून देविका वैद्य आणि श्रद्धा पोखरकरने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
या आव्हानाचा पाठलाग करताना महाराष्ट्राची एकही फलंदाज आपल्या लौकिकाला न्याय देऊ शकली नाही. एका बाजूने तेजल हसबनीस खेळत असताना तिला साथ देण्यातही अन्य फलंदाज अपयशी ठरल्या. केवळ यामुळेच तेजल हसबनिसची शतकी खेळी व्यर्थ ठरली. महाराष्ट्राचा डाव १९३ धावांवर आटोपला.
सामना संपण्यास एक चेंडू शिल्लक असताना तेजल हसबनीस बाद झाली. तेजल हसबनिसने १४२ चेंडूंत तेरा चौकारांसह आपली शतकी खेळी केली. उत्तराखंडच्या मानसी जोशीने ४० धावांत पाच तर सफिनाने तीन गडी बाद करत तिला सुरेख साथ केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.