Women's Primer League RCBW vs UPW :
यूपी वॉरियर्सने आरसीबीचे 139 धावांचे आव्हान 13 षटकात बिनबाद पार केले. सलामीवीर एलिसा हेलीने 47 षटकात नाबाद 96 धाा ठोकल्या. तर तिला देविका वैद्याने नाबाद 36 धावा करत चांगली साथ दिली.
तत्पूर्वी, वुमन्स प्रीमियर लीगच्या आठव्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने सर्वबाद 138 धावा केल्या. अनुभवी एलिस पेरीने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. सलामीवीर सोफी डिवाईनने देखील 36 धावा केल्या. मात्र इतर फलंदाजांनी फक्त खेळपट्टीवर हजेरी लावली. यूपीकडून सोफी एकलस्टोनने 4 तर दिप्ती शर्माने 3 विकेट्स घेत आरसीबीच्या फलंदाजीला खिंडार पाडले.
यूपी वॉरियर्सने आरसीबीचे 139 धावांचे आव्हान 13 षटकात बिनबाद पार केले. सलामीवीर एलिसा हेलीने 47 षटकात नाबाद 96 धाा ठोकल्या. तर तिला देविका वैद्याने नाबाद 36 धावा करत चांगली साथ दिली.
आरसीबीचे विजयासाठीचे 139 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उरतलेल्या यूपी वॉरियर्सने दणक्यात सुरूवात केली. कर्णधार एलिसा हेलीने पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी केली. तर तिला देविका वैद्यने बॉल टू रन करत उपयुक्त साथ दिली. या दोघींनी पॉवर प्लेमध्येच यूपीला 55 धावांपर्यंत पोहचवले. दरम्यान, हेलीने आपले अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या बाजूने वैद्यही तिला चांगली साथ देत होती. या दोघांनी आपली ही भागीदारी बघता बघता शंभरपर्यंत नेली.
एलिस पेरीने 39 चेंडूत 52 धावा करत आरसीबीला 125 धावांपर्यंत पोहचवले खरे मात्र तिला दिप्ती शर्माने स्लॉग ओव्हरमध्ये बाद करत आरसीबीला मोठा धक्का दिला. पेरीनंतर आलेल्या फलंदाजांनी फक्त फज्जाला पाय लावून परतणेच पसंत केले.
सोफी बाद झाल्यानंतर पेरीने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. मात्र कनिका 8 धावांची तर हेथर नाईट 2 धावांची भर घालून माघारी परतली. पेरीने झुंजार खेली करत 13 व्या षटकात आरसीबीचे शतक धावफलकावर लावले.
स्मृती मानधना 4 धावा करून बाद झाल्यानंतर सोफी डिवाईन आणि एलिस पेरी यांनी आरसीबीचा डाव सावरत 9 षटकात 73 धावांपर्यंत पोहचवले. मात्र एकलस्टोनने सोफीचा 36 धावांवर त्रिफळा उडवत ही जोडी फोडली.
भारताची स्टार फलंदाज आणि WPL मधील सर्वात महागडी खेळाडू स्मृती मानधनाला फलंदाजीत फारशी चमक दाखवता येत नाहीये. आता सलग चौथ्या सामन्यात स्मृती मानधना स्वस्तात माघारी परतली. तिला राजेश्वरी गायकवाडने अवघ्या 4 धावांवर बाद केले.
स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.