womens t20 wc ind vs pak players interaction fter match players seen taking photos video goes viral  
क्रीडा

Ind Vs Pak : गळाभेट, सेल्फी, कॉमेडी… मैदानावरची दुष्मनी मैदानावर; पाकिस्तानकडून VIDEO शेअर

सकाळ डिजिटल टीम

भारत पाकीस्तान यांच्यातील सामना म्हटलं की कुठंतरी टीव्ही फुटणार हे ठरलेलं असतं. क्रिकेटच्या सामन्यात दोन्ही देशातील लोकांची भावनिक गुंतवणूक प्रचंड असते.

दरम्यान ICC महिला टी-20 विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान केपटाऊन येथील मैदानावर हायव्होल्टेज सामना खेळला गेला अन् भारतीय संघाने विश्वचषकची सुरूवात विजयाने केली आहे. दरम्यान या विजयानंतर भारत आणि पाकीस्तानच्या संघाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअऱ करणअयात आळा आहे. न्यूलँड्स येथे भारत-पाक सामन्यानंतर खेळाडूंचा एकमेकांशी संवाद असे कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे.

या जवळपास दीड मिनीटांच्या व्हिडीओमध्ये दोन्ही संघाच्या खेळाडू चर्चा, गळाभेटी, हस्तांदोलन, हास्याविनोद करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये खेळाडू एकमेकांसोबत हसताना फोटो घेताना देखील दिसत आहेत. या व्हिडीओला ट्विटरवर तीन हजारांहून अधिक लाइक्स आहेत.

भारतीय महिला संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने 150 धावांचे लक्ष्य दिले होते, जे भारताने 19 षटकांत 3 विकेट्स गमावून पूर्ण केले. जेमिमा रॉड्रिग्जने शानदार अर्धशतकी खेळी खेळली. त्याचवेळी ऋचा घोषने तिला चांगली साथ दिली.

पाकिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून भाटिया आणि शेफाली वर्मा सलामीला आल्या. शेफालीने 25 चेंडूत 33 धावा केल्या. त्याने 4 चौकारही मारले. भाटियाने 2 चौकारांच्या मदतीने 17 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने 12 चेंडूत 16 धावा केल्या. त्याच्या खेळीत 2 चौकारांचा समावेश होता. जेमिमाने शानदार कामगिरी करत नाबाद अर्धशतक झळकावले.

जेमिमा 55 चेंडूत 68 धावा करत नाबाद राहिली आणि रिचाने 25 चेंडूत 43 धावा केल्या. जेमिमाने आपल्या डावात सात चौकार मारले, तर रिचाने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी नाबाद 58 धावांची भागीदारी झाली. जेमिमाला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. भारतीय संघाच्या या दमदार विजायानंतर सोशल मीडियावर भारतीय संघाचे तोंडभरून कौतुक केलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT