Watch an incredible one-hander Catch by Beth Mooney Sakal
क्रीडा

VIDEO : कॅचेस विन मॅचेस; मूनीचा फायनलचं तिकीट पक्क करणारा कॅच बघाच

सकाळ डिजिटल टीम

Australia Women vs West Indies Women, 1st Semi Final : न्यूझीलंडमध्ये सुरु असलेली महिला वर्ल्ड कप स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आलीये. मागील वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाकडून सेमी फायनलमध्ये पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि यंदाच्या हंगामात भारताच्या पराभवामुळे सेमीच तिकीट मिळवलेल्या वेस्टइ इंडीज यांच्यात सेमीफायनलचा पहिला सामना रंगला आहे. वेलिंग्टन (Basin Reserve, Wellington) मैदानात रंगलेल्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे निर्धारित 50 षटकांचा सामना प्रत्येकी 45-45 षटकांचा करण्यात आला. वेस्ट इंडीज संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा हा निर्णय ऑस्ट्रेलियाने हाणून पाडत मोठी धावसंख्या उभारली.

एलिसा हिली(Alyssa Healy) नं 107 चेंडूत केलेली 129 धावांची खेळी आणि सलामीची बॅटर रिचल हेन्स (Rachael Haynes) हिने 100 चेंडूत 85 धावा करत संघाला दमदार सुरुवात करुन दिली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी 216 धावांची भागीदारी रचली. बेथ मूनीनं (Beth Mooney) 31 चेंडूत नाबाद 41 धावांची खेळी करत संघाची धावसंख्या नव निर्धारित 45 षटकात बाद 305 धावांपर्यंत पोहचवली. (One-hander Catch by Beth Mooney)

या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजची सुरुवात खराब झालीये. वेस्ट इंडीजच्या संघाने शंभरीच्या आत तीन विकेट गमावल्या. यात रशदा विल्यम्सची विकेट खास अशीच होती. दमदार फटकेबाजी करणाऱ्या बेथ मूनीनं क्षेत्ररक्षणातील सर्वोत्तम नमुना दाखवून देत तिला खातेही न उघडता तंबूत धाडले. मेगनच्या गोलंदाजीवर विल्यम्सने पुलचा फटका खेळला. यावेळी मूनीनं हवेत झेप मारुन एका हातात झेल पकडला. महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल पैकी एक असा झेल तिने टिपलाय. या झेलची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT