world athletics championships 2023 eight india players parul choudari neeraj chopra ramesh ajmal ramesh Sakal
क्रीडा

World Athletics Championship : जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा कस लागणार; भालाफेक, स्टीपलचेसमध्ये अपेक्षा

जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचे किमान सातआठ खेळाडू अंतिम फेरी गाठतील असे भाकीत स्पर्धेपूर्वी वर्तवण्यात आले होते.

सकाळ वृत्तसेवा

बुडापेस्ट : जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचे किमान सातआठ खेळाडू अंतिम फेरी गाठतील असे भाकीत स्पर्धेपूर्वी वर्तवण्यात आले होते. त्यापैकी अविनाश साबळे आणि श्रीशंकर मुरलीने निराशा केली.

आता तीन भालाफेकपटू व महिलांच्या स्टीपलचेस शर्यतीत पारुल चौधरी अंतिम फेरीत आहे. पुरुषांच्या ४-४०० मीटर रिले संघाबाबत अंतिम फेरीची कुणी अपेक्षाही केली नव्हती; मात्र या संघाने चक्क आशियाई विक्रम करीत प्राथमिक फेरीत दुसरे स्थान प्राप्त केले आणि पदकाच्या शर्यतीत प्रवेश केला.

अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या आठ संघांत अमेरिकेपाठोपाठ भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर असून प्राथमिक फेरीतील कामगिरीची पुनरावृत्ती या संघाने केल्यास ऐतिहासिक पदक दूर नाही. भारताच्या ४-४०० मीटर पुरुष रिले संघाने जागतिक स्पर्धेत सहभागी होण्याची ही चौथी वेळ असून प्रथमच या संघाने प्राथमिक फेरीचा अडथळा पार केला आहे.

चारशे मीटरचा राष्ट्रीय विक्रमवीर महम्मद अनसने भारताला दमदार सुरुवात करून दिल्यावर अमोल जेकबने तोच वेग कायम ठेवला. त्यामुळे इतर संघ दबाबाखाली आले. तिसऱ्या स्थानावर असलेल्या महम्मद अजमलने शेवटच्या टप्प्यात अमेरिकन धावपटूपासूनचे अंतर वाढणार नाही ही काळजी घेतली.

ज्या वेळी शेवटच्या चारशे मीटरसाठी राजेश रमेशच्या हाती बॅटन आले, त्या वेळी ‘मर जा लेकीन छोडना मत’ असा आवाज दिला. याचा परिणाम फारसा अनुभव नसलेल्या रमेशवर झाला. त्याने वेग वाढवण्यास सुरुवात केली आणि काही मीटर तर त्याने अमेरिकेच्या जस्टीन रॉबीन्सनला मागेही टाकले होते. त्या वेळी दोघांना एकमेकांचा धक्काही लागला.

अखेर रॉबीन्सनने वेग वाढवला व प्रथम क्रमांकाने (२ मिनिटे ५८.४७ सेकंद) शर्यत पूर्ण केली. रमेशने दुसऱ्या क्रमांकावर शर्यत पूर्ण करताना भारताने २ मिनिटे ५९.०५ सेकंदाचा नवीन आशियाई विक्रम प्रस्थापित केला. यापूर्वीचा २ मिनिटे ५९.५१ सेकंदाचा विक्रम जपान संघाच्या नावावर होता.

रमेश कोसळला

अंतिम रेषा पार करताच रमेश ट्रॅकवर कोसळला. अखेर त्याला व्हील चेअरवरून मैदानाच्या बाहेर नेण्यात आले. याबाबत अमोल जेकब म्हणाला, काही हरकत नाही. त्याला काहीही झालेले नाही. आज ज्या वेगाने धावला, त्यापेक्षा जास्त वेगाने तो अंतिम फेरीत धावेल. भारतीय संघाला अंडरडॉग्ज म्हटले गेले, काही हरकत नाही; मात्र आम्ही आमचे अस्तित्व दाखवून दिले, असेही तो म्हणाला.

नोह लायेल्सचे तिहेरी यश

एक काळ होता, उसेन बोल्ट मैदानावर उतरला की १००, २०० मीटर आणि ४-१०० मीटर रिले अशी तीन पदके त्याच्या नावावर पक्की असायची. त्याचा जलवा संपला आणि एकालाही तशी कामगिरी करता आली नाही.

अखेर वेगवान धावपटू ठरलेल्या अमेरिकेच्या नोह लायेल्सने तीन पदके जिंकून पुढील काही वर्षे आपली असतील असे संकेत दिले. त्याने १०० मीटरनंतर २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आणि ४-१०० मीटर रिले शर्यतीतही अमेरिकेला सुवर्णपदक मिळवून दिले. रिले शर्यतीत अंतिम रेषा पार केल्यावर त्याने तीन बोटे उंचावून आपला आनंद व्यक्त केला.

किपयेगॉनला पाच हजारचे सुवर्ण

पंधराशे मीटर शर्यतीत सलग तिसरे सुवर्णपदक मिळवणाऱ्या केनियाच्या फेथ किपयेगॉनने पाच हजार मीटर शर्यत जिंकून एकाच स्पर्धेत पंधराशे आणि पाच हजार मीटर शर्यतीत सुवर्ण अशी कामगिरी करणारी पहिली धावपटू होण्याचा मान मिळवला.

या वेळेही मूळ इथिओपियन असलेली; मात्र येथे नेदरलँडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सिफान हसनला फेथवर मात करता आली नाही. फेथने १४ मिनिटे ५३.८८ सेकंद; तर सिफानने रौप्यपदक जिंकताना १४ मिनिटे ५४.११ सेकंद वेळ दिली.

ड्युप्लांतिसचा विश्वविक्रम हुकला

पोल व्हॉल्टमध्ये स्वीडनच्या मोंडो ड्युप्लांतिसने स्वतःचाच ६.२२ मीटरचा विश्वविक्रम मोडण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरला; मात्र ६.१० मीटर कामगिरीसह त्याने सलग दुसऱ्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. ६.१० मीटर अंतरावर उडी मारल्यावर त्याने थेट ६.२३ मीटरवर प्रयत्न केला; मात्र या उंचीवर तिन्ही प्रयत्नांत तो अपयशी ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT