world athletics championships 2023 javelin throw schedule time neeraj chopra Sakal
क्रीडा

World Athletics Championships 2023 : नीरज चोप्राची आज प्राथमिक फेरी

जागतिक ॲथलेटिक्स ः मनू व किशोर जेनाचाही सहभाग

सकाळ वृत्तसेवा

बुडापेस्ट : जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत प्रथम सहा दिवसांत केवळ दोन भारतीय ॲथलिटला अंतिम फेरी गाठण्यात यश आले. या दोघांनी आपल्या सर्वोत्तम कामगिरीच्या पलीकडे मजल मारली, तरच त्यांच्याकडून पदकाची अपेक्षा करता येईल.

मात्र, सध्या तरी पदकाची हमखास अपेक्षा असलेला एकमेव खेळाडू म्हणजे भालाफेकपटू नीरज चोप्रा. उद्या, शुक्रवारी तो प्राथमिक फेरीत सहभागी होत आहे. नीरजसोबत डीपी मनू व किशोर जेना हे अन्य खेळाडूही सहभागी होत आहे.

टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर गेल्या वर्षी युजिन येथे नीरजला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली होती. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने नीरजवर मात करीत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले होते.

असे असले तरी यंदाच्या मोसमात पीटर्सला प्रभावी कामगिरी करता आली नाही. यंदा त्याची सर्वोत्तम कामगिरी ८५.८८ मीटरची असून नीरजने यंदा दोहा डायमंड लीगमध्ये प्रथम स्थान मिळविताना ८८.६७ मीटरची कामगिरी केली होती.

ही त्याची यंदाच्या मोसमातील सर्वोत्तम कामगिरीही होय. कारण त्यानंतर लुसान डायमंड लीगमध्ये त्याला ८७.६६ मीटर कामगिरीवरच समाधान मानावे लागले होते. नीरजच्या खात्यात ज्युनिअर जागतिक स्पर्धा, दक्षिण आशियाई, आशियाई ॲथलेटिक्स, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल, ऑलिंपिकचे सुवर्णपदक, जागतिक स्पर्धेचे रौप्यपदक आहे.

मात्र, भालाफेकीतील ९० मीटरच्या जादुई आकड्यापासून तो अद्याप दूर आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला एका मुलाखतीत तो म्हणाला, निश्चितच हा आकडा गाठायला मला आवडेल. मात्र, त्यासाठी पोषक हवामान असायला हवे आणि सर्व काही जुळून यायले हवे.

प्राथमिक फेरीतून अंतिम फेरी गाठण्यासाठी ८३ मीटरचा निकष ठेवण्यात आला असून हा आकडा पार करण्यासाठी नीरजला फारशी अडचण येणार नाही, अशी शक्यता आहे. नीरजच्या गटातच भारताचा डीपी मनू असून त्याची यंदाची सर्वोत्तम कामगिरी ८४.३३ मीटर अशी आहे.

त्यामुळे त्याला अंतिम १२ खेळाडूंत स्थान मिळविण्यासाठी जोर लावावा लागणार आहे. भारताचा तिसरा खेळाडू किशोर जेनाचा ‘ब'' गटात समावेश असून त्याची फेरी दुपारी ३.१५ (भारतीय वेळेनुसार) ला सुरू होईल. गेल्यावर्षीचा राष्ट्रकुल विजेता व गेल्या स्पर्धेत पाचवे स्थान मिळविणारा व पाकिस्तानचा अर्शद नदीमचा किशोरच्या गटात समावेश आहे.

प्रमुख प्रतिस्पर्धी

  • ज्युलियस येगो (केनिया-माजी विजेता)

  • ज्युलियन वेबर (जर्मनी-युरोपियन विजेता)

  • अँडरसन पीटर्स (ग्रेनेडा-गेल्या दोन स्पर्धेतील विजेता)

  • केशॉर्न वॉलकॉट (त्रिनिदाद व टोबॅगो-माजी ऑलिंपिक विजेता)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT