Neeraj Chopra at World Athletics Championships 2023  
क्रीडा

Neeraj Chopra : नीरज चोप्राच्या 'सुवर्ण' इतिहासात आणखी एक अध्याय, पाकिस्तानसह संपूर्ण जगाला हरवून बनला 'वर्ल्ड चॅम्पियन'

नीरज चोप्राने इतिहास रचला

Kiran Mahanavar

World Athletics Championships 2023 Javelin Throw Final Neeraj Chopra : भारतीय गोल्डन बॉय नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम फेरीत इतिहास रचला आहे. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

भारताचा स्टार खेळाडू नीरजने हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथील नॅशनल अॅथलेटिक्स सेंटरमध्ये 88.17 मीटर भाला फेकून सुवर्णपदकावर कब्जा केला. अंतिम फेरीत एकूण सहा प्रयत्न झाले असून नीरजने दुसऱ्या फेरीपासून गुणतालिकेत आघाडी कायम ठेवली होती.

मात्र, अंतिम फेरीत नीरज चोप्राची सुरुवात चांगली झाली नव्हती. त्याचा पहिलाच थ्रो फाऊल झाला(Neeraj Chopra's first attempt is a foul) . पहिल्या प्रयत्नानंतर नीरज एकूण 12 फायनलिस्टमध्ये शेवटच्या स्थानावर होता. कारण पहिल्या थ्रो मध्ये फाऊल करणारा तो एकमेव होता.

असे असूनही नीरज निराश झाला नाही आणि तिने त्याच्या पुढच्याच प्रयत्नात जबरदस्त पुनरागमन केले. नीरजच्या दुसऱ्या थ्रोमध्ये, भाला थेट 88.17 मीटर अंतरावर पडला आणि यासह नीरजने पहिल्या क्रमांकवर कब्जा केला (Neeraj Chopra registers a 88.17m throw in his 2nd attempt). नीरजची ही आघाडी तिसऱ्या प्रयत्नानंतरही कायम राहिली आणि 86.32 मीटर फेक करूनही तो पूर्वार्धात पहिल्या स्थानावर राहिला.

दुसरीकडे पाकिस्तानच्या अर्शद नदीमनेही संथ सुरुवातीनंतर पुनरागमन केले. अर्शदचा पहिला थ्रो 74.80 आणि दुसरा 82.81 मीटर होता. नदीमने पुन्हा तिसऱ्या थ्रोमध्ये 87.82 मीटरचे अंतर पूर्ण केले. नीरजनंतर दुसरे स्थान पटकावले आणि रौप्य पदक जिंकले.

त्याच वेळी, भारताच्या डीपी मनूने तिसऱ्या प्रयत्नात 83.72 मीटरची थ्रो केली, तर किशोर जेनाने दुसऱ्या थ्रोमध्ये 82.82 मीटरचा टप्पा गाठला. अशाप्रकारे, दोन्ही भारतीय देखील टॉप-8 मध्ये राहिले आणि त्यांना दुसऱ्या हाफमध्ये स्थान मिळवता आले, जिथे त्यांना आणखी 3-3 थ्रो मिळाले.

प्रत्येक मोठ्या चॅम्पियनशिप आणि इव्हेंटमध्ये पदक जिंकण्याची सवय लावलेल्या नीरजने भारतीय अॅथलेटिक्सच्या इतिहासात यापूर्वी कधीही न घडलेला पराक्रमही केला. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 2 पदके जिंकणारा नीरज पहिला भारतीय ठरला. नीरजने गेल्या वर्षी युजीनमध्ये झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले होते.

पात्रता फेरीतील पहिल्याच प्रयत्नात नीरजने शुक्रवारी 88.77 मीटर फेक करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या कामगिरीच्या जोरावर तो पुढील वर्षी पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला. ही त्याची मोसमातील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आणि एकूण चौथी कामगिरी ठरली.

गेल्या वेळी नीरजने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले होते. 25 वर्षीय भारतीय स्टार अॅथलीटने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. 2018 मधील आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही तो सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी ठरला. त्याने गेल्या वर्षी डायमंड लीगही जिंकली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT