World Cup 2023 Babar Azam sakal
क्रीडा

World Cup 2023 : 'नव्याने होणाऱ्या संघउभारणीत नेतृत्व करण्याची इच्छा' पाकिस्तानच्या कर्णधारपदी बाबर कायम

सकाळ ऑनलाईन टीम

एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम पाकमधील सर्वांसाठी टार्गेट ठरला. त्याच्या कर्णधारपदाबाबत सर्वच माजी खेळाडू प्रश्नचिन्ह उभे करत आहेत; पण पाक संघाच्या नव्याने होण्याऱ्या संघाच्या उभारणीत आपल्याला नेतृत्वपदी कायम रहायला आवडेल, असे मत त्याने व्यक्त केले.

आम्ही सर्व जण एकत्र बसून नेमके काय चुकले, याचे विश्लेषण करून, यातून सकारात्मक गोष्टी पुढे कायम ठेवण्याचा विचार करू आणि चुकांपासून बोध घेऊन नव्याने संघ उभारण्याचा प्रयत्न करू; परंतु त्यामध्ये मला कर्णधारपदी राहायचे आहे, अशी इच्छा बाबरने प्रकट केली.

या विश्वकरंडक स्पर्धेत आमची कामगिरी निराशाजनक होती, याचा खेद आहेच; परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकला असता, तर चित्र वेगळे दिसून आले असते, असे असले तरी आम्ही फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही चुका केल्या.

प्रशिक्षक आर्थर बाबरच्या पाठीशी

बाबर आझमवर सर्व स्तरांतून टीका होत असताना प्रशिक्षक मिकी आर्थर मात्र त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मी बाबरच्या पाठीशी आहे. तो तरुण आहे. त्याला आत्ता साथ देण्याची गरज आहे. या अनुभवातून तो प्रगल्भ होईल, असे आर्थर म्हणाले. बाबरबाबत ते पुढे म्हणतात, मी त्याला जवळून ओळखतो, तो फलंदाज म्हणून उत्तम आहेच; पण कर्णधार म्हणूनही प्रत्येक दिवशी प्रगती करत आहे. त्याला सुधारणा करण्यास वेळ द्यायला हवा, त्याच्याकडून काही चुका झाल्या असतील, परंतु तो गुन्हेगार नाही, चुका झाल्या नाहीत तर तुम्ही शिकणारही कसे, भविष्यात तो पाक संघाला चांगले दिवस दाखवू शकतो. या विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानला नऊ साखळी सामन्यात केवळ चार विजय मिळवता आले. नेदरलँड्स आणि बांगलादेश यांचा पराभव करून त्यांनी विजयी मोहीम सुरू केली होती; परंतु अहमदाबादमध्ये भारताविरुद्ध पराभव झाल्यानंतर त्यांची पराभवाची मालिका सुरू झाली.

फिरकी गोलंदाजांचे अपयश

आमच्या फिरकी गोलंदाजांनी फार निराशा केली. डावाच्या मध्यावर त्यांनी विकेट मिळवून ब्रेक थ्रू देणे अपेक्षित होते; परंतु तसे काहीच घडले नाही. याउलट आम्ही धावाच अधिक देत राहिलो. डावाच्या अखेरीसही काही खराब चेंडू टाकण्यात आले. डावाच्या मध्यावर विकेट मिळवल्या असत्या, तर प्रतिस्पर्थ्यांना रोखण्यात यश आले असते, असे विश्लेषण बाबरने केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Captain Rohit Sharma : रोहित शर्माने धोनीची परंपरा कायम राखली, विजयाची ट्रॉफी दिली युवकांच्या हाती अन्... Video Viral

Akshay Shinde : मोठी अपडेट! बदलापूर प्रकरणात शाळेचा अध्यक्ष अन् सचिवाला कोर्टाचा दणका

Virat Kohli: विराटचं मोठं मन! शाकिब अल हसनला दिली बॅट गिफ्ट, Video होतोय व्हायरल

Rahul Gandhi: अनंत अंबानीच्या लग्नावर राहुल गांधींनी उपस्थित केला प्रश्न; म्हणाले, अंबानी कुटुंबाचा पैसा...

IND vs BAN: १८ वी कसोटी मालिका अन् १८० व्या सामन्यात विजय! टीम इंडियासाठी कानपूर सामना ठरला विक्रमी

SCROLL FOR NEXT